वारणानगरमध्ये साकारणार छत्रपती शिवरायांची जगातील सर्वात मोठी रांगोळी
36 टन रांगोळीचा वापर, ११ एकरात काढली जाणार ही रांगोळी
कोल्हापूर
वारणा नगरला साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची विश्वविक्रमी रांगोळी साकारली जाणार आहे. ही रांगोळी ११ एकरात काढली जाणार असून यासाठी ३६ टन रांगोळीचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती आमदार विनय कोरे यांनी यावेळी दिली.
पुढे आमदार कोरे म्हणाले, महाराष्ट्राला आणि कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान वाटावा असा उपक्रम वारणानगर मध्ये होत आहे. राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्त या विश्वविक्रमी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही संकल्पना शिक्षक समीर काळे सर यांच्या मेहनतीतून साकारली जात आहे. ११ एकरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी साकारून जागतिक विक्रम नोंदवण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सर्वतोपरी मदत वारणा संघातर्फे केली जाणार आहे.
रांगोळीचे काम गेले १५ ते २० दिवसांपासून सुरु आहे. ३५ टन ही रांगोळी या उपक्रमासाठी लागणार आहे. अनेक लोकांनी सढळ हाताने या उपक्रमासाठी मदत केली आहे तर सहभागी महिलांनीही वर्गणी काढली आहे. ३५० महिला या उपक्रमात सहभागी झालेल्या आहेत. सव्वाशे फूट उंचीवरून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ही रांगोळी लोकांना दिसणार आहे. याठीकाणी मोठ्या स्क्रिनच्या माध्यमातूनही लोकांना ही रांगोळी पाहता येणार आहे. या रांगोळीचे उद्घाटन १२ तारखेला होणार आहे. या कार्यक्रमात रांगोळी कलाकार महिलांचे सत्कार होणार आहे, अशी माहिती आमदार विनय कोरे यांनी दिली.