कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Yoga for Health : योग, ताणतणावाच्या जीवनात ठरतोय लाभदायक

04:43 PM Jun 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

योग तज्ञांकडून प्रशिक्षण घेऊनच आसने करणे महत्वाचे 

Advertisement

By : संग्राम काटकर

Advertisement

कोल्हापूर : संपूर्ण जगात प्रसार होत असलेली योग ही प्राचीन भारतीय परंपरा आहे. जी सुमारे 5,000 वर्षांपूर्वी उगम पावली आहे. योग ही एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. योगाचा उल्लेख प्राचीन वेदांमध्ये मिळतो. त्यानंतर ऋषी-मुनिंनी विविध शैली आणि तत्त्वज्ञान विकसित केले. या पद्धतीत शारीरिक आसने, श्वास घेण्यासोडण्यावरील नियंत्रण, ध्यान आणि नैतिक मूल्ये आढळतात.

योग या शब्दाचा उद्गम संस्कृतमधील युज् या शब्दातून झाला आहे. शरीर, मन आणि आत्म्याला एकत्र आणणे हा योगाचा प्रमुख उद्देश आहे. आजच्या आधुनिक व धकाधकीच्या जीवनात स्थिरता मिळवण्यासाठी योग करणे गरजेचे झाले असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झालेले आहे.

शिवाय योगा केल्याने ताण-तणाव, शारीरिक आजार आणि मानसिक अस्वस्थता दुर होण्यास मदत होते. त्यामुळे योगाचा प्रसार व प्रचार हा फक्त भारतातच नव्हे जगात होत आहे. शिवाय योगाची प्राचीन पद्धती जनमाणसांच्या जीवनात आनंद, स्वास्थ्य आणि शांती आणण्याचे काम करत

योगामुळे होणारे शारीरिक फायदे

योग हा शारीरिक व्यायामासोबतच आत्म्याचा विकास, नैतिकता व अध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी कामी येतो. तसेच योगाच्या प्रक्रियेत संयम, प्रेम, करुणा आणि आत्मसाक्षात्कार महत्त्वाचा असतो.

योगा प्रशिक्षकांकडून मार्गदशन घेणे आवश्यकच...

आजच्या घडीला मोबाईलद्वारे ऑनलाइन क्लासेस, अॅप्सद्वारे योग करणे अगदी सोपे झाले आहे. असे असले तरी योग करण्याचे प्रशिक्षण हे केवळ आणि केवळ प्रशिक्षकांकडून घेणे आवश्यक आहे. चुकीच्या तंत्राने आसने केल्यास गंभीर स्वऊपाची दुखापत होऊ शकते. परंतू प्रशिक्षकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार नियमित योगा केल्यास त्याचे फायदे भरपूर मिळतात.

खालील तीन प्राणायम अगदी महत्वाचे :

1) उज्जयि प्राणायाम : गळ्याच्या मागील भागातून श्वास घेणे आणि सोडणे, आवाज निर्माण करणे. असे केल्याने मानसिक शांतता लाभते. शरीरात ऊर्जावृद्धी होते.
2)
नाडीशोधन (अनुलोम विलोम) : उजव्या आणि डाव्या नाकपुडीने श्वास घेणे व सोडणे. असे केल्याने शरीरातील ऊर्जाचा समतोल राखण्यास मदत होते.
3)
कपालभाति : यामध्ये जलद फुफ्फुसीय श्वास घेणे व सोडणे. असे केल्याने शरीरातील विषारी तरंग बाहेर टाकण्यास मदत होते.

सध्याच्या आधुनिक युगात जनमाणसांसमोर निर्माण होत असलेली आव्हाने अशी :

ताण-तणाव : कामाचा ठिकाणी आणि अन्य कारणांनी जीवनाचा ताण-तणाव वाढत आहे.

आजारपण : हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याचा धोका.

शारीरिक निक्रियता : जास्त वेळ मोबाईल अथवा संगणकाच्या क्रीनसमोर राहणे. शरीराची हालचाल कमी करणे.

मानसिक अस्वस्थता : चिंता, नैराश्य, निद्रानाशाने माणसांना ग्रासने

आधुनिक जीवनशैली टिकून राहण्यासाठी योगा करणे महत्वाचेच :

- सकाळी काही मिनिटे योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार किंवा ध्यान करणे.

- ऑफिसमध्ये छोटा ब्रेक घेऊन वज्रासन किंवा आरामदायक आसने करणे.

- घरच्या घरी, कामाच्या ठिकाणी, जिममध्ये योगासने करण्याची सवय लावून घेणे.

- आरामदायक वस्त्र परिधान करणे.

 - ध्यान आणि श्वासावर लक्ष केंद्रित करावे.

विविध आसने शरीराची लवचिकता वाढवतात, जडणघडण सुधारतात.

- आचार, विचार, आहार हे योगाच्या तत्त्वांशी जुळवून घेतल्यास जीवनशैली सुधारते.

प्रत्येकाने रोज किमान 10 असने केली तर उत्तमच. हे सर्व असने 30 मिनिटांमध्ये पूर्ण होतात.

ताडासन : शरीर ताणून आळस निघून जातो.

वृक्षासन : शरीराचा तोल राखण्यास मदत होते.

त्रिकोणासन : बरोबर पाठीच्या मणक्याचा खांद्यांचा हाताचा व्यायाम होतो

हस्त पादासन : दोन्ही पायावर उभे राहून अंगठे धरणे. असे केल्याने मेंदूला चांगला रक्तप्रवाह होण्यास मदत होते. कमरेवर ताण पडून आराम मिळतो.

वज्रासन : हे आसन जेवणानंतर करावे. या आसनामुळे पचनक्रिया सुधारते.

भुजंगासन : हात पोट आणि मानचे स्नायू बळकट होतात.

मंडूकासन : दोन्ही हाताच्या मुठी नाभीजवळ ठेवून वाकणे. नाभीजवळ इन्सुलिन तयार होण्यास मदत होते.

सर्वांगासन : जमिनीवर मान ठेवून सर्व शरीर उचलणे. मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो. मानेचे स्नायू बळकट होतात.

पवन मुक्तासन : जमीन समांतर झोपून दोन्ही गुडघे नकाजवळ घेणे. असे केल्याने पोटातील वायू बाहेर पडण्यास मदत होते.

पद्मासन : असे केल्याने ध्यानधारणा चांगल्या पद्धतीने करण्यास मदत होते. मन एकाग्रही होते.

आपल्यासाठी 30 मिनिटे राखीव ठेवा...

"सध्याच्या काळासोबतच दैनंदिन कामातील पद्धती झपाट्याने बदलत आहेत. त्याच्यासोबत ताण-तणाव वाढत असल्याच्या तक्रारीही वाढत चालल्या आहेत. त्यामुळे जास्ती नाही परंतू गरजेनुसार योगातील काही आसने गरजेचे आहे. जे कोणी नित्यनियमाने आसने करतील, त्यांना स्थिरता, मनशांती व अंगात नवी ऊर्जा निर्माण झाल्याची अनुभूती येत राहिल. त्यामुळे प्रत्येकाने सकाळची किमान 30 मिनिटे आपल्यासाठी राखीव ठेवून योगातील आसने करावीत."

Advertisement
Tags :
@kolhapur#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediahealthhealth newsWorld Yoga Day 2025yoga
Next Article