चिंचणीच्या सहा वर्षीय अन्वीचा विश्वविक्रम
05:27 PM Jan 29, 2025 IST | Radhika Patil
Advertisement
कडेगाव :
Advertisement
चिंचणी तालुका कडेगाव येथील अन्वी संजय माने या सहा वर्षांच्या चिमुकलीने रोलर स्केटिंग विश्वविक्रमामध्ये सहभाग नोंदवत सलग 1 तास 25 मिनिटे 25 सेकंद रोलर स्केटिंग करून भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची कामगिरी केली आहे.
26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित विविध ठिकाणी भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी रोलर स्केटिंगचा उपक्रम राबविला होता. जिह्यात इस्लामपूर येथे गोंदकर स्पोर्ट्स एस एम रोलर स्केटिंग क्लबने उपक्रम राबविला. यामध्ये 5 ते 16 वर्षांपर्यंतच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. चिंचणीच्या अन्वीने विक्रमी कामगिरी केली. तिला इस्लामपुर येथील प्रा†शक्षक सागर साळुंखे व माया साळुंखे यांचे मार्गदर्शन मिळाले.
Advertisement
Advertisement