विश्वचषक विजेत्या अंध महिला क्रिकेट संघाने घेतली पंतप्रधानांची भेट
06:05 AM Nov 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : कोलंबो येथे झालेल्या अंध महिलांच्या पहिल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेपाळला 7 गड्यांनी पराभूत करुन भारतीय महिला क्रिकेट संघाने जेतेपद मिळविले. भारतीय अंध संघातील सदस्यांनी गुरुवारी पंतप्रधानांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपली स्वाक्षरी असलेली बॅट पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिली तर नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्यासाठी चेंडूवर स्वाक्षरी केली.
Advertisement
Advertisement