For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

जागतिक बँकेने भारताच्या जीडीपीचा अंदाज वाढविला

06:25 AM Oct 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
जागतिक बँकेने भारताच्या जीडीपीचा अंदाज वाढविला
Advertisement

आर्थिक वर्ष 2027 साठी 6.6 टक्के वरुन 7.1 टक्क्यांपर्यंत राहणार असल्याचे संकेत :’इंडिया डेव्हलपमेंट अपडेट या अहवालामधून माहिती

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जागतिक बँकेने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज आर्थिक वर्ष 2026-27 साठी 7.1 टक्के पर्यंत वाढवला आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये, जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2027 साठी अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 6.6 टक्के असेल असा अंदाज वर्तवला होता. संस्थेने मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘इंडिया डेव्हलपमेंट अपडेट’ या आपल्या ताज्या अहवालात ही माहिती दिली.

Advertisement

जागतिक व्यापार आणि जागतिक तणाव असूनही, भारताच्या अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जूनमध्ये नोंदवलेल्या 7.8 टक्के जीडीपी वाढीने जागतिक बँकेच्या या अंदाजात वाढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गावांमध्ये आणि शहरांमध्ये मागणीत झालेली वाढ, निर्यातीची उत्तम कामगिरी जागतिक बँकेनुसार, गुंतवणूक आणि खासगी उपभोग हे भारताच्या आर्थिक वाढीतील सर्वात मोठे योगदानकर्ते ठरले आहेत.

ग्रामीण भागातील कृषी क्षेत्रातील उत्तम कामगिरी, सरकारी उत्पन्न सहाय्य, अन्न अनुदान आणि कमी महागाईमुळे मागणीला चालना मिळाली आहे. दुसरीकडे, आयकर आणि जीएसटीमध्ये कपात झाल्यानंतर शहरी भागातील वापरामध्ये मोठी वाढ झाली आहे.

निर्यात क्षेत्राची उत्तम कामगिरी: जागतिक स्तरावरील प्रतिकूल परिस्थिती असूनही, भारताच्या निर्यातीने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, जो आर्थिक वर्ष 2027 च्या विकास दृष्टिकोनासाठी सर्वात मोठा सकारात्मक घटक मानला जातो.

औद्योगिक घडामोडींना गती:

जागतिक आव्हाने असूनही पुरवठा बाजूच्या औद्योगिक घडामोडींनी गती दर्शविली आहे. पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रात तेजी: पायाभूत सुविधा आणि बांधकाम साहित्यातील वाढ गेल्या वर्षीच्या 6.1 टक्के वरून पहिल्या तिमाहीत 7.2 टक्के पर्यंत वाढली. त्याच वेळी, तीव्र उष्णतेमुळे उपयुक्त सेवांची मागणी वाढली, ज्यामुळे वीज क्षेत्राने 9.3 टक्के इतकी वाढ नोंदवली.

कृषी: ऑगस्टपर्यंत कमी पावसामुळे ग्रामीण मागणीवर किंचित परिणाम होऊ शकतो. जुलैनंतर झालेल्या पावसामुळे ही तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली असली तरी, एकूण कमी पावसाचा कृषी क्षेत्राच्या शक्यतांवर फारसा परिणाम झालेला नाही.

2026 मध्ये अर्थव्यवस्था 7.8टक्के दराने विकसित

जागतिक बँकेने दिलेल्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2025 मध्ये 7.2टक्के दराने वाढल्यानंतर, आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 7.8टक्के दरासह वेगाने वाढली. सुयोग्य धोरणे आणि सुलभ पतपुरवठ्याच्या वातावरणामुळे जागतिक व्यापार तणावाचा परिणाम निष्प्रभ झाला होता. आर्थिक वर्ष 2027 मध्येही, पहिल्या तिमाहीतील 7.8टक्केच्या वाढीनंतर आगामी तिमाहींमध्ये वाढीचा दर किंचित कमी होण्याची शक्यता आहे, परंतु एकूण कल मजबूत राहील.

Advertisement
Tags :

.