महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विश्व अॅथलेटिक फेडरेशनची वर्ष अखेरची नवी स्पर्धा

06:36 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मोनॅक

Advertisement

आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स फेडरेशनतर्फे आता प्रत्येक वर्षीच्या अॅथलेटिक्स हंगामाच्या अखेरीस मोठ्या बक्षीस रकमेची अॅथलेटिक्स स्पर्धा घेण्याचा निर्णय घोषित करण्यात आला.

Advertisement

विश्व अॅथलेटिक्स फेडरेशनच्या कार्यकारिणी समितीची बैठक सोमवारी येथे झाली. या बैठकीमध्ये वर्ष अखेरच्या नव्या आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. सदर स्पर्धेत विक्रमी 1 कोटी अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. सदर स्पर्धा आता भविष्य काळात विश्व, ऑलिम्पिक आणि डायमंड लीग स्पर्धेबरोबरच महत्त्वाची म्हणून ओळखली जाईल. या स्पर्धेमध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन, विश्व चॅम्पियन आणि डायमंड लीग स्पर्धेतील विजेत्यांमध्ये जेतेपदासाठी खरी चुरस राहिल. ट्रॅक आणि फिल्ड स्पर्धेच्या इतिहासामध्ये विजेत्यांसाठीची ही सर्वात मोठी बक्षीसाची रक्कम ठेवण्यात आली आहे. 2026 च्या फिल्ड आणि ट्रॅक हंगामाच्या अखेरीस विश्व अॅथलेटिक्स फेडरेशनची ही शेवटची स्पर्धा बुडापेस्ट येथे 11 ते 13 सप्टेंबर 2026 साली आयोजित केली आहे. गेल्या वर्षी विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे यजमानपद बुडापेस्टने भूषविले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article