For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटतर्फे आज विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

11:32 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटतर्फे आज विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
Advertisement

हॉस्पिटॅलिटी अॅण्ड टुरिझम क्षेत्राविषयी तज्ञांकडून मार्गदर्शन : उद्या खानापूर येथे कार्यशाळा 

Advertisement

बेळगाव : लोकमान्य ट्रस्टच्या ‘माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सावंतवाडी’ च्यावतीने विद्यार्थ्यांसाठी बुधवार दि. 3 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘करियर ऑप्शन इन हॉस्पिटॅलिटी अॅण्ड टुरिझम इंडिस्ट्रीज’ या विषयावर सकाळी 10.45 वा. टिळकवाडी येथील जीएसएस कॉलेजच्या के. एम. गिरी सभागृहात कार्यशाळा होईल. या कार्यक्रमाला लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर उपस्थित राहणार आहेत. विशेष निमंत्रित म्हणून लोकमान्य ट्रस्टच्या संचालक सई ठाकुर-बिजलानी उपस्थित असतील. त्याचबरोबर एज्युकेशन को-ऑर्डिनेटर डॉ. डी. एन. मिसाळे, जीएसएस कॉलेजच्या केमिस्ट्री विभागाचे प्रमुख डॉ. संदीप देशपांडे, लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब, आयटीसी वेलकम हॉटेल्सचे जनरल मॅनेजर राहुल कांगो, माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्रा. अनिरुद्ध दास, कर्मा हॉस्पिटॅलिटी गोवाचे कॉर्पोरेट जनरल मॅनेजर निशांत दुदवानी उपस्थित राहणार आहेत.

हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात नव्याने पाय रोवणाऱ्या माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटने शंभर टक्के प्लेसमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याबरोबरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. सावंतवाडी येथील निर्सगरम्य परिसरात कॉलेज सुरू केले जात आहे. अनेक नामवंत हॉटेल व्यवसायातील तज्ञ कॉलेजमध्ये प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले आहेत. त्यामुळेच नॅशनल व इंटरनॅशनल प्लेसमेंटची ग्वाही देण्यात आली आहे.एकीकडे बेरोजगारी वाढत असताना दुसरीकडे फुड इंडस्ट्री मात्र झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्राला मनुष्यबळाची मोठी गरज आहे. केवळ देशात नाही तर परदेशातही हॉटेल्स मॅनेजमेंट क्षेत्राला असणारी मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेत स्थानिक विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी कॉलेज सुरू करण्यात आले आहे.

Advertisement

या कॉलेजमध्ये बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी अॅण्ड हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन या पदविकेसोबतच डिप्लोमा इन फुड प्रॉडक्शन, डिप्लोमा इन फ्रंट ऑफीस ऑपरेशन, डिप्लोमा इन हाऊस किपींग ऑपरेशन हे डिप्लोमा कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. या बरोबरीने कॉलेजने अॅडव्हान्स सर्टीफिकेट इन हॉस्पिटॅलिटी ऑपरेशन, सर्टिफिकेट इन फुड प्रोडक्शन अॅण्ड पॅटिसरी व सर्टिफिकेट इन फुड अॅण्ड ब्रेव्हरेज सर्व्हिस हे कोर्स दहावी उत्तीर्णांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. दहावी,बारावीतील विद्यार्थ्यांना हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम क्षेत्रातील माहिती मिळावी यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. बुधवार दि. 3 रोजी दुपारी 2.30 वा. किल्ला येथील भरतेश पीयू कॉलेजमध्ये तर गुरुवार दि. 4 रोजी सकाळी 11 वा. खानापूर येथील लोकमान्य सोसायटीच्या रावसाहेब वागळे पीयू कॉलेजमध्ये माहितीपर कार्यशाळा होणार आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळांचा लाभ घ्यावा, असे आवाहन माई इन्स्टिट्यूटतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.