For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पक्षाच्या चौकटीत राहून कार्य करणे

10:02 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
पक्षाच्या चौकटीत राहून कार्य करणे
Advertisement

शक्य नसल्यास हेब्बार यांनी राजीनामा द्यावा : नवनिर्वाचित खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांचा सल्ला

Advertisement

कारवार : जिल्ह्यातील यल्लापूर-मुंदगोडचे भाजपचे आमदार शिवराम हेब्बार यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत मतदान केले नाही. हेब्बार यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजप उमेदवारांचा प्रचार केला नाही. हेब्बार यांना भाजपच्या चौकटीत राहून कार्य करणे शक्य नसेल तर आमदारपदाचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जावे, असे आवाहन कारवारचे नवनिर्वाचित खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी केले. ते येथील पत्रकार भवनात पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले, पक्षाला बाधा आणणारे कार्य हेब्बार यांना शोभत नाही. जर का त्यांना पक्षात राहून पक्षासाठी कार्य करणे शक्य नसेल तर त्यांनी आमदारपदाचा राजीनामा दिला पाहिजे. पक्षात राहून पक्षाचे कार्य न करता जनता आणि कार्यकर्त्यांची दिशाभूल करणे लोकशाहीमध्ये शोभून दिसत नाही आणि म्हणूनच हेब्बार यांनी राजीनामा द्यावा व पुन्हा एकदा जनादेशला सामोरे जावे. जनता काय आदेश देते त्याचा स्वीकार करूया, असे सांगून हेगडे पुढे म्हणाले, हेब्बार ज्या पद्धतीने वागत आहेत ते योग्य नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत कारवार मतदारसंघातून मुस्लिमांनी भाजपला नव्हे तर काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे, हे मतमोजणीच्यावेळी स्पष्ट झाले आहे. आपण निवडणुकीपूर्वी आणि आताही सांगत आहे. मुस्लिमांची एकगट्टा मते काँग्रेसच्या पारड्यात पडली आहेत, हे योग्य नव्हे. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ उठवायचा आणि मते काँग्रेसला द्यायची हे कितपत योग्य आहे असा प्रश्न हेगडे यांनी उपस्थित केला.

Advertisement
Advertisement
Tags :

.