For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘कार्यकर्ता‘ हेच खरे बलस्थान

06:24 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘कार्यकर्ता‘ हेच खरे बलस्थान
Advertisement

? भारतीय जनता पक्षात स्टार प्रचारकांची कमतरता नाही. उत्तम वक्त्यांची तर प्रारंभापासूनच वानवा कधी नव्हती. आजही 36 उत्कृष्ट मैदानी वक्ते या पक्षापाशी असून ते देश पिंजून काढत आहेत. तथापि, मतदाराच्या पातळीवर काम करणारा कार्यकर्ता हे या पक्षाचे खरे बळ आहे. हा पक्ष कार्यकर्ता आधारित पक्ष आहे.

Advertisement

? ‘घरचे खाऊन पक्षासाठी राबणे“ ही 50-60 च्या दशकातील संकल्पना आता बरीचशी मागे पडली आहे. राजकीय पक्ष जसे पैशाने समृद्ध होत गेले, तशा कार्यकर्त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. जेवणखाण तसेच प्रतिदिन मानधन मिळाल्याशिवाय कार्यकर्ते मिळत नाहीत, असा उमेदवारांचा अनुभव असतो.

? तथापि, भारतीय जनता पक्षात आजही पक्षाकडून किंवा उमेदवारांकडून अपेक्षा न बाळगता केवळ पक्षाची विचारसरणी पटल्यामुळे आणि तिचा प्रसार करण्यासाठी प्रचारकार्य करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत, असे अनेक तज्ञांचे मत आहे. असे निष्ठावान कार्यकर्ते या पक्षाला संघाकडून मिळत असतात.

Advertisement

? या कार्यकर्त्यांच्या जोरावर मतदानाच्या दिवशी भारतीय जनता पक्षाची काही टक्के मते वाढू शकतात. कारण मतदारांना मतदानकेंद्रांपर्यंत आणण्याचे उत्तरदायित्व निभावण्यासाठी मोठ्या संख्येने निष्ठावान कार्यकर्ते लागतात. ते केवळ ‘मर्सिनरीज“ किंवा भाडोत्री सैनिकांप्रमाणे असले, तर काम चांगले होत नाही.

? अशा वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या हे भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट्या असल्याचे अनेक राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. हे या पक्षाचे खरे बळ आहे. पक्षानेही ते गेली कित्येक दशके व्यवस्थित जोपासले आहे. या कार्यकर्त्यांमधून या पक्षाला त्याचे भावी लोकप्रतिनिधी मिळतात असे बोलले जाते.

अत्याधुनिक प्रचारयंत्रणा

? हे भारतीय जनता पक्षाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्या म्हणून गणले गेले आहे. काहींच्या मते, इतर पक्षांमध्येही आज आधुनिक तंत्रज्ञानाचा बोलबाला पहावयास मिळतो, ती प्रेरणा त्यांना या पक्षाकडूनच मिळालेली असल्याचे दिसते. सोशल मिडियाचा सर्वात प्रथम, सर्वात अधिक आणि सर्वात प्रभावी उपयोग करण्याचा पायंडा याच पक्षाने पाडला आहे, असे अनेक तज्ञांनी दर्शविलेले आहे.

? सोशल मिडियावर कल्पक जाहीराती देण्याचे कौशल्य आता अनेक पक्षांनी साध्य केले आहे. तथापि, याचाही प्रारंभ भारतीय जनता पक्षाने केला. संगणकाधारित प्रचारपद्धती, माहिती संकलित करणे आणि तिचे विश्लेषण करणे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, माहिती तंत्रज्ञान आणि आता कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान उपयोगात केला जातो.

Advertisement
Tags :

.