Satara News | अजिंक्यतारा किल्ल्यावर कामगाराचा सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू
04:06 PM Mar 03, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
अजिंक्यतारा परिसरात कामगार सुरक्षा उठले प्रश्न
Advertisement
सातारा- अजिंक्यतारा किल्ला येथे काम करत असताना एका कामगाराचा सुमारे २०० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, किल्ल्यावर सुरू असलेल्या कामादरम्यान संबंधित कामगाराचा तोल जाऊन तो खोल दरीत कोसळला. सुमारे दोनशे फूट खाली पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम यांनी अत्यंत धाडसाने खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढला. बचाव कार्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
Advertisement
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कामगारांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
Advertisement