कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सहाव्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू

11:08 AM Jul 14, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

चिपळूण :

Advertisement

सेट्रिंगचे काम करताना 28 वर्षीय एक कामगार इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी शहरातील पाग पॉवर हाऊस येथे घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

संजीव रामसुरेश कुमार (28, खेर्डी-भुरणवाडी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबतची खबर रवळू ज्योतीबा गुरव यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवळू गुरव यांनी घेतलेल्या पाग पॉवर हाऊस येथील इमारतीचे आर.सी.सी. सेट्रिंगचे काम संजीव करत होता. यावेळी त्याचा पाय घसरल्याने अखेर तो या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन जमिनीवर कोसळला. यात त्याला गंभीररित्या दुखापत झाल्याने यावेळी रवळू गुरव याच्याकडे कामास असलेला अमर विश्वकर्मा याने त्याला उपचारासाठी कामथे रुग्णालयात नेले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून संजीव याला मृत घोषित केले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article