For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj News : सह्यादी स्टार्च कारखान्यात अँगल तुटल्याने खाली पडून कामगाराचा मृत्यू

04:18 PM Dec 25, 2025 IST | NEETA POTDAR
miraj news   सह्यादी स्टार्च कारखान्यात अँगल तुटल्याने खाली पडून कामगाराचा मृत्यू
Advertisement

                            मिरज एमआयडीसी कारखान्यात कामगारांच्या सुरक्षिततेवर चिंता

Advertisement

कुपवाड : मिरज एमआयडीसी येथील सह्यादी स्टार्च कारखान्यात परजिल्ह्यातील खाजगी कंत्राटदारामार्फत स्क्रैप लोखंडी बॉयलर कटींग करण्याचे काम सुरू असताना अँगल तुटल्याने तीन कामगार खाली कोसळले. यापैकी एका परप्रांतीय कामगाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. यात अन्य दोघे कामगार जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यामध्ये कमलेश कुशवाह (वय ४५, सध्या रा. मिरज एमआयडीसी, मूळ गाव इंगुरी ता.सराई जि. जबरिया उत्तरप्रदेश) असे मयत कामगाराचे नाव आहे. याबाबत कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.पोलिसांच्या व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मिरज एमआयडीसीतील सह्यादी स्टार्च कारखान्यात जुने स्क्रैप लोखंडी बॉयलर होते. ते बॉयलर परजिल्ह्यातील एका खाजगी कंपनीला विकले होते. त्या बॉयलरचे कटिंग करण्याचे काम एका खाजगी ठेकेदारामार्फत सुरू होते.

Advertisement

सर्व कामगारठेकेदारामार्फत होते. मंगळवारी रात्री मयत कामगार कमलेश कुशवाह हा अन्य कामगारासोबत नेहमीप्रमाणे सह्यादी स्टार्च कारखान्यात काम करीत होता. रात्री साडेदहाच्या सुमारास काम सुरू असताना अँगल तुटला आणि तीन कामगार खाली पडले. यातील कमलेश कुशवाह गंभीर जखमी झाला. त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्याबर उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अन्य दोघा जखमी कामगारावर त्याच रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी पाहणी केली.

Advertisement
Tags :

.