Solapur News : सोलापुरात रेल्वे पुलावरील डांबरी रस्त्याचा मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
सोलापुरात ऐतिहासिक पुलाचे युद्धपातळीवर पाडकाम सुरू
सोलापूर : दमाणी नगर परिसरातील तब्बल १०३ वर्षे जुना झालेला रेल्वे पूलाचे आयुष्य संपुष्टात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत असताना अखेर या पुलाचे हटवण्याचे काम दुसऱ्या दिवशीही युद्धपातळीवर सुरू होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रेल्वे विभाग यांच्यातील समन्वयाने या ऐतिहासिक पुलाच्या पाडकामाला वेग आला आहे.
गुरुवारी (दि. ११) सकाळपासूनच या कामाला सुरुवात झाली आहे. 14 डिसेंबरला पूर्णपणे पूल पाडण्याच्या दृष्टीने कोणत्या ठिकाणी ट्रेन लावायच्या कोणाच्या ठिकाणी जेसीबी उभे करायचे या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी तसेच रेल्वेचे अधिकारी या कामावर लक्ष ठेवून आहेत. यावेळी कामाचा वेग, सुरक्षा, क्रेन, गर्डर कटिंग यासह सर्व टप्प्यांचा आढावा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेण्यात येत आहे.
पूल पाडण्याचे काम सुरू असताना यावेळी भैय्या चौक आणि मर्या चौक येथून पायी येणाऱ्या नागरिकांची संख्या मात्र कमी झालेली नाही. पुलावरील डांबरी रस्त्याचा मलबा उचलताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यामुळे काम करताना येथील कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत.