महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विकसित, समृद्ध काणकोण घडविण्यासाठी काम करा

12:40 PM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काणकोणातील मुक्तीदिन सोहळ्यात सभापती रमेश तवडकर यांचे आवाहन : येणाऱ्या काळात तालुक्याची पाणी-वीज समस्या पूर्णपणे सुटणार

Advertisement

काणकोण : 2030 सालचा विकसित आणि समृद्ध काणकोण घडविण्यासाठी काणकोणच्या विविध कार्यालयांत काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे आणि जागरुक नागरिकांनी सजगतेने वावरावे, असे आवाहन काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी काणकोणच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आयोजित करण्यात आलेल्या मुक्तीदिन सोहळ्यात केले. या सरकारी कार्यक्रमाला तवडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तवडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर काणकोणचे पोलीस उपनिरीक्षक स्वराज्य देसाई यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने दिलेली मानवंदना त्यांनी स्वीकारली. यावेळी काणकोण जवाहर नवोदय विद्यालय, सेंट तेरेझा विद्यालय, मल्लिकार्जुन महाविद्यालय, मल्लिकार्जुन विद्यालय, बलराम निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, मामलेदार मनोज कोरगावकर, पोलीस उपअधीक्षक संदेश चोडणकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी सभापतींचे स्वागत केले.

Advertisement

मुक्त गोव्याचे भाग्यविधाते स्व. दयानंद बांदोडकर आणि त्यानंतरचे स्व. मनोहर पर्रीकर यांच्याप्रमाणेच विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आत्मनिर्भर गोव्यासाठी वावरत आहे. गोवा मुक्तीसाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. येणाऱ्या काळात काणकोणची पाणी आणि वीज समस्या 100 टक्के सोडवितानाच दीर्घकाळापासूनची मागणी असलेल्या बाळ्ळी ते काणकोणपर्यंतच्या चौपदरी रस्त्याचे काम देखील पूर्ण होणार आहे. काणकोणात भेडसावणारी रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी प्रदूषणविरहीत प्रकल्प या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न चालू आहे, असे सांगून सभापती तवडकर यांनी विकासाच्या बाबतीत राजकारण आणू नका, असा सल्ला दिला. काणकोणच्या मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या राष्ट्रीय एकात्मतापर गीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर वेलवाडा, महालवाडा अंगणवाड्यांचे विद्यार्थी तसेच सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, बलराम निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, उपनगराध्यक्ष नारसिस्को फर्नांडिस, अन्य नगरसेवक, उपजिल्हाधिकारी गावकर, मामलेदार कोरगावकर आणि अन्य उपस्थित होते.

राष्ट्रीय खेळांतील पदकविजेत्यांचा गौरव

नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या 37 व्या राष्ट्रीय खेळांत काणकोण तालुक्यातील ज्या 9 खेळांडूनी विविध पदके मिळविली त्यांचा सभापती तवडकर यांच्या हस्ते या सोहळ्यात गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक असे त्याचे स्वरूप राहिले. त्यात दर्शन अर्जुन वेळीप, चंद्रहास महादेव वेळीप, प्रज्ञा नारायण गोसावी, योगिता महादेव वेळीप, नेहा म्हाबळू गावकर, सीता गोसावी, सूरज वेळीप, संतोष सुधाकर गावकर, मनीषा अशोक देविदास यांचा समावेश राहिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष पै यांनी केले. दरम्यान, काणकोण नगरपालिकेजवळ नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. काणकोण पालिकेचे मुख्याधिकारी नार्वेकर यांनी आपल्या स्वागतापर भाषणात गोवा मुक्तीलढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले, तर नगराध्यक्ष गावकर यांनी सकारात्मक गोष्टींना विरोध न करण्याचे आवाहन केले. यावेळी सर्व नगरसेवक, पालिकेचे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालिका निरीक्षक येसो देसाई यांनी केले. काणकोण पोलीस स्थानकाजवळ उपअधीक्षक संदेश चोडणकर, काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राजवळ डॉ. जुझे तावारीस, गावडोंगरी पंचायतीजवळ सरपंच धिलोन देसाई, खोतीगाव पंचायतीजवळ सरंपच आनंद देसाई, पैंगीण पंचायतीजवळ सरपंच सविता तवडकर, श्रीस्थळ पंचायतीजवळ सरपंच सेजल गावकर, लोलये पंचायतीजवळ सरपंच निशा च्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेलवाडा ते श्रद्धानंद विद्यालयापर्यंत प्रभात फेरी काढली. यात प्राथमिक तसेच माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, पालक सहभागी झाले होते. यावेळी पैंगीण बाजारात असलेल्या स्वातंत्र्यसेनानी स्व. आल्फ्रेड आफोंस यांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article