For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणबर्गी रोडवरील भूमिगत वीजवाहिनीचे काम रखडले

12:43 PM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
कणबर्गी रोडवरील भूमिगत वीजवाहिनीचे काम रखडले
Advertisement

कणबर्गी रोड उड्डाणपूल ते ऑटोनगरपर्यंत खोदकाम : अर्धवट कामामुळे नागरिकांतून संताप

Advertisement

बेळगाव : कणबर्गी रोडवर भूमिगत वीजवाहिन्या घालण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र कित्येक दिवस झाले सदर काम संथगतीने होत असून सध्या काम ठप्प झाले आहे. कणबर्गी रोड उड्डाणपूल ते ऑटोनगरपर्यंत खोदकाम करण्यात आले आहे. काही ठिकाणी खोदकाम करताना पाण्याची गळती सुरू आहे. सदर मार्ग वाहतुकीसाठी महत्त्वाचा असून खोदकामामुळे समस्या निर्माण होत आहेत. यासाठी संबंधित कंत्राटदाराने लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे. भूमिगत वीजवाहिन्या घालण्यासाठी सुरू करण्यात आलेले खोदकाम अनेक दिवसांपासून संथगतीने सुरू असून सध्या काम जवळपास ठप्प झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उड्डाणपुलापासून ऑटोनगरपर्यंत रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. मात्र खोदकामानंतर पुढील कामाला अपेक्षित गती मिळालेली नसून अनेक ठिकाणी खड्डे उघडे आहेत. यामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम होत असून अपघाताचा धोकादेखील वाढला आहे. संबंधित कंत्राटदार आणि विभागाने रखडलेले काम तातडीने पूर्ण करून रस्ता पूर्ववत करावा. तसेच पाण्याच्या गळतीची दुऊस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

असुविधा

Advertisement

खोदकामादरम्यान काही ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनना धक्का बसल्याने पाण्याची गळती सुरू आहे. कणबर्गी रोड हा शहरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग असल्याने दररोज हजारो वाहनांची या मार्गावरून ये-जा असते. खोदकामामुळे रस्ता अऊंद झाला असून वाहतूक कोंडी, धूळ व असुविधांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

Advertisement
Tags :

.