For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फुलबाग गल्ली-तानाजी गल्ली मार्गाच्या कामाला गती

10:40 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
फुलबाग गल्ली तानाजी गल्ली मार्गाच्या कामाला गती
Advertisement

काम सुरू झाल्याने वाहनधारक अन् रहिवाशांतून समाधान 

Advertisement

बेळगाव : फुलबाग गल्ली ते तानाजी गल्लीपर्यंतच्या मार्गाचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी गटारीचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. आता ड्रेनेज घालण्याचे काम हाती घेण्यात आले असून, जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदण्याचे काम कंत्राटदाराकडून सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी सदर मार्गाची अत्यंत वाताहत झाली होती. सदर कामाबाबत ‘तरुण भारत’मधून आवाज उठवण्यात आला होता. आता मार्गाच्या कामाला गती आली असून, रहिवाशांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

फुलबाग गल्ली ते तानाजी गल्लीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. याची दखल घेऊन संबंधित विभागाने रस्त्यावर मुरुम टाकले होते. यानंतर मार्गाच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी पावसाळ्यानंतर परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले होते. त्याचबरोबर गटार बांधकामासाठीही खोदकाम करण्यात आले होते. मात्र, काम हाती घेण्यात न आल्याने गटारकामही आहे त्या स्थितीत होते. यामुळे तेथील व्यापाऱ्यांसह रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.

Advertisement

संबंधित विभागाकडून गटारकाम पूर्ण करण्यात आले असून, आता ड्रेनेजचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी फुलबाग गल्लीच्या सुरुवातीलाच मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. याद्वारे पाईपलाईन टाकण्यात येणार असून, ड्रेनेज समस्याही निकालात काढण्याच्या दृष्टीने काम करण्यात येत आहे. सदर मार्गाचे काम जलद गतीने करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. विभागाकडून मार्गाची कामे गतीने करण्यात येत असल्याने प्रवासी व रहिवाशांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.