For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यायप्रविष्ट जागेतील काम बंद पाडले

06:33 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
न्यायप्रविष्ट जागेतील काम बंद पाडले
Advertisement

हलगा-मच्छे बायपासबाबत शेतकऱ्यांची ठाम भूमिका

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

हलगा-मच्छे बायपासमधील न्यायप्रविष्ट जागेत रस्ता करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतला. वर्कऑर्डर नसताना व झिरो पॉईंट सिद्ध झाल्याशिवाय शेतात पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. अखेर न्यायप्रविष्ट जागेतील काम बंद पाडण्यात आले. मागील काही दिवसात ऊन पडल्याने हलगा-मच्छे बायपासच्या कामाला पुन्हा गती आली आहे. काही भागात भराव टाकण्यासोबत काँक्रिटीकरणाचे काम जोरात सुरू आहे. परंतु अद्यापही शेतकऱ्यांचा विरोध मावळलेला नाही. जोवर झिरो पॉईंटचा निकाल लागत नाही तोवर रस्ता करू देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

Advertisement

मागील दोन दिवसांपासून न्यायप्रविष्ट जागेत काम केले जात होते. त्याला शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. दावा सुरू असताना काम सुरू करू दिले जाणार नाही, असे सांगण्यात आले. अखेर कंत्राटदाराने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनीही शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांसमोर पोलीस कर्मचाऱ्यांना नमते घ्यावे लागले.

रितसर कागदपत्रे सादर करून त्यानंतरच कामाला सुरुवात करा, असे सांगण्यात आले. त्यामुळे कंत्राटदाराने तेथून आपली यंत्रणे हलविली. यामुळे मंगळवारी व बुधवारी शेतकरी व कंत्राटदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :

.