For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निरवडेत गतीरोधक पट्ट्यांच्या कामाला सुरुवात

03:11 PM Jan 07, 2026 IST | अनुजा कुडतरकर
निरवडेत गतीरोधक पट्ट्यांच्या कामाला सुरुवात
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

सावंतवाडी शिरोडा मार्गावरील निरवडे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेगरोधक पट्टे बसवण्याचे काम हाती घेतले असून या कामाचा शुभारंभ निरवे गावचे उपसरपंच अर्जुन पेडणेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.सावंतवाडी शिरोडा हा मार्ग अत्यंत रहदारीचा असून या मार्गावरुन वाहने सुसाट वेगाने धावत असतात.विशेषत : या परिसरात शाळेत जाणारे विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते.यामुळे सुसाट वाहनांमुळे नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला होता.ही गंभीर बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते संजय तानावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने आता या मार्गावरील वेगाला सलाम बसणार आहे.हे काम मार्गी लागल्याने स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून या मागणीची दखल घेतल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता प्रमोद लोहार यांचे संजय तानावडे आणि निरवडे ग्रामस्थांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले आहेत.याप्रसंगी उपसरपंच अर्जुन पेडणेकर,यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संजय तानावडे, संतोष गावडे,चेतन गावडे,साई तानावडे, विलास गावडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.या वेगरोधकांमुळे आता परिसरातील शालेय विद्यार्थी आणि पादऱ्यांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.