For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवी गल्ली शहापूर येथील सर्व्हिस रोडच्या कामाला चालना

10:56 AM Jul 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
नवी गल्ली शहापूर येथील सर्व्हिस रोडच्या कामाला चालना
Advertisement

बेळगाव : प्रभाग क्र. 27 मध्ये येणाऱ्या नवी गल्ली शहापूर येथील सर्व्हिस रोडच्या कामाला नगरसेवक रवी साळुंखे यांच्या हस्ते कुदळ मारून चालना देण्यात आली. अपूर्ण रस्ता कामाला सुरुवात करण्यात आल्याने स्थानिक रहिवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे.नवी गल्ली येथील सर्व्हिस रोडचे यापूर्वी काँक्रीटीकरण करण्यात आले होते. मात्र उर्वरीत रस्त्याच्या कामाला मंगळवारी नगरसेवक साळुंखे यांच्या निधीतून पूजन करून रस्त्याच्या कामाला चालना देण्यात आली. यावेळी इमामकाझी बिजगर्णी, फयाज ताशिलदार, मुनीर मकानदार, रशिद हंसवाले यांच्यासह गल्लीतील नागरिक व ठेकेदार उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.