Shirala News | शिराळा तालुक्यातील 'या' दोन गावांची ससेहोलपट थांबणार; वर्षभराच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रशासनाला जाग!
वारणावती : शिराळा पश्चिमभागाला बरदान ठरलेला वारणा डावा कालव्या वरील करूंगली, गुंडगेवाडी दरम्यानचा पुल गेल्यावर्षी कोसळला होता त्यामुळे नागरिकांना बाहतुकीस अडथळा निर्माण होत होता मात्र याच ठिकाणी नंजुर झालेल्या नवीन पुलाच्या बांधकामास सुरुवात झाल्याने येथील नागरीकांची ससेहोलपट लवकरच थांबणार असल्याने त्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
शिराळा पश्चिम भागांतील करूंगली गावाजवळूनच बारणा डाबा कालवा गेला आहे. या वारणा डाव्या कालव्यावरून गुंडगेवाडी गावाला जाण्यासाठी हा एकमेव जवळचा मार्ग आहे याच मार्गे गुढे पाचगणी पठारावर व तिथून पुढे कराड व पाटणतालुक्याला जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने कालव्यावरील पुलावरून वाहनांची व शेतकऱ्यांची रहदारी होती मात्र गेल्यावर्षी ३० जुलै २०२५ रोजी हा धोकादायक जीर्ण पुल कोसळला व या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
येथील गुंडगेवाडी व करूंगली येथील ग्रामस्थ शेतकरी वर्गालाही त्याचा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी नवीन पुल होण्यासंदर्भात संबधीतविभागाकडे मागणी केली होती संबधीत विभागाने त्याची दखल घेवुन करूंगली ते गुंडगेवाडी दरम्यान बारणाकालव्यावर नवीन पुल मंजुर केला व सध्या या नवीन पुलाच्या कामास सुरुवात केली आहे. कालव्यावर होणार्या नवीन पुलामुळे येथील ग्रामस्थ, शेतकरी यांची पुलाअभावी होणारी गैरसोय दुर होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. यावेळी करूंगली गुंडगेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.