For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-रामनगर-पणजी महामार्गाचे काम कासवगतीने

10:33 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव रामनगर पणजी महामार्गाचे काम कासवगतीने
Advertisement

काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गटारींची पडझड : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशात तीव्र संताप : मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याची मागणी

Advertisement

जोयडा : बेळगाव-रामनगर ते पणजी या राष्ट्रीय महामार्गाचे काम कासवगतीने होत आहे. काही ठिकाणी गटारकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गटारींची पडझड होत आहे. राष्ट्रीय महामार्ग मंडळ धारवाड विभागाचे अभियंता वर्गाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार तिनईघाट, रामनगर, जळक्याटी, अनमोड, कॅसलरॉक, अकेती गावातील नागरिकांनी, ग्रा. पं. सदस्य व वाहन चालक यांच्यातून होत आहे. अनमोड गावाजवळच्या पुढील वळणावर पावसाचे पाणी रस्त्यावर येऊ नये व भुस्खलन होऊ नये म्हणून गटार बांधली आहे. गटार बांधून एक महिनासुद्धा झाला नाही. या गटारीची पडझड झाली आहे. यामुळे समोरासमोर दोन मोठी वाहने आल्यास रस्ता सोडून खाली उतरावे अथवा साईड देताना वाहन खाली उतरावे लागते अशावेळी गटारीमध्ये वाहने अडकण्याची अथवा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गटारी बांधनाता कंत्राटदाराने स्टील न वापरताच केवळ खडी व सिमेंट वापरुन बांधकाम केले आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकार यांच्याकडून या राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरण, विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी कोट्यावधी रुपये मंजूर झाले असताना अशा प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर गटारींचे काम स्टील न वापरताच पूर्ण केले आहे. या समस्येकडे अभियंता वर्ग पाहून न पाहिल्यासारखे वागत आहेत. यामुळे कंत्राटदाराची मनमानी चालू आहे, अशी जोरदार टीका गावकरी व स्थानिक वाहन चालक संघटना यांनी केली आहे.

सात वर्षापासून काम रखडले आहे

Advertisement

सात वर्षापूर्वी बेळगाव-रामनगर-पणजी या मार्गावर येणाऱ्या कर्नाटक हद्द असलेल्या अनमोड घाटापर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकार यांच्याकडून कामाला प्रारंभ झाला. बेळगाव ते खानापूरपर्यंतचे काम पूर्ण झाले पण खानापूर ते रामनगर पुढील अनमोड घाटापर्यंतचे काम अजून पूर्ण झाले नाही. काम कासवगतीने होत आहे. यामुळे प्रवासी, वाहन चालक व स्थानिक जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. खासकरून गरोदर महिला, बाळंतिण, वृद्ध नागरिकांना प्रवास करणे त्रासदायक झाले आहे. मे च्या शेवटपर्यंत उरलेले काम पूर्ण करा, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.