For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सवासाठी वीज वाहिन्यांची उंची वाढविण्याच्या कामाला सुरुवात

06:08 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
गणेशोत्सवासाठी वीज वाहिन्यांची उंची वाढविण्याच्या कामाला सुरुवात
Advertisement

मंडळांनीही सहकार्य करण्याचे हेस्कॉमचे आवाहन

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

बेळगावमध्ये भव्यदिव्य गणेशोत्सव साजरा होत असतो. यावर्षीही मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी केली असून मूर्तींची उंचीही वाढली आहे. परंतु यामुळे हेस्कॉमवर अतिरिक्त कामाचा बोजा पडणार आहे. यासाठी आतापासूनच वीज वाहिन्यांची उंची वाढविण्यास हेस्कॉमकडून सुरुवात करण्यात आली आहे.

अवघ्या दीड महिन्यावर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने तयारीला वेग आला आहे. हेस्कॉमकडून मागील वर्षी एरियल बच्ड केबल घालून धोका कमी करण्यात आला होता. त्याचबरोबर यावर्षी घरगुती कनेक्शन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ठेवून नवीन वीज खांब घातले जात आहेत. सध्या गृहज्योतीचे काम सुरू असल्याने हे काम संथगतीने सुरू असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून गती मिळणार आहे.

यावर्षी 15 ऑगस्टपासून आगमन सोहळ्यांना सुरुवात होण्याची शक्यत आहे. त्यापूर्वी हेस्कॉमला वीज वाहिन्यांची उंची वाढवावी लागणार आहे. यापूर्वी आठ मीटर असलेले वीज खांब नऊ मीटर करूनदेखील गणेशमूर्तींची उंची वाढत असल्याने वीज खांबांना सपोर्टर लावावे लागत आहेत. त्यामुळे मंडळांनीही गणेश मूर्तींवर कमी उंचीच्या प्रभावळ व डेकोरेशन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेस्कॉमकडून मंडळांना आवाहन

काही गल्ल्यांमध्ये घरगुती कनेक्शन्ससाठी ओढण्यात आलेल्या वीज वाहिन्या कमी उंचीवर आहेत. गणेशमूर्तीची उंची अधिक असेल तर वीज वाहिन्या बंद करणे गरजेचे आहे. त्यामुळे आगमन सोहळा, विसर्जनावेळी हेस्कॉमशी संपर्क साधणे आवश्यक आहे. तसेच ज्या मंडळांना वीज वाहिन्यांची उंची वाढवून हवी असेल त्यांनी शहर हेस्कॉम विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.