कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिऱ्यापेक्षा मूल्यवान लाकूड

06:36 AM Apr 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विशिष्ट लाकडाची मागणी वाढतीच

Advertisement

जगभरात अनेक प्रकारची लाकडं मिळत असतात, त्यांचा वेगवेगळ्या कारणांसाठी वापर केला जात असतो. या लाकडांपासून फर्निचर, सजावटीची सामग्री किंवा दैनंदिन वापरात असलेल्या सामग्रीची निर्मिती केली जाते. परंतु जगात एक असे लाकूड आहे, ज्याची किंमत हिरे आणि सोन्यापेक्षाही अधिक आहे. याचे नाव अगरवुड असून हे जगातील सर्वात दुर्लभ आणि सर्वात महाग विकले जाणारे लाकूड आहे. याचे लाकूड एक्वीलेरियाच्या वृक्षापासून प्राप्त केले जाते. याला एलोववुड किंवा ईगलवुड देखील म्हटले जाते. अगरवुडच्या लाकडाला वुड्स ऑफ द गॉड देखील म्हटले जाते.

Advertisement

किती आहे किंमत?

अगरवुडच्या लाकडाची किंमत 1 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 73 लाख 50 हजार रुपये प्रति किलोग्रॅम आहे.  अगरवुडचे वृक्ष मुख्यत्वे दक्षिणपूर्व आशिया, चीन, अरब आणि जपानसोबत भारताच्या जंगलांमध्ये आढळून येतात. या लाकडाचा वापर अत्तर निर्माण करण्यासाठी केला जात असतो. परंतु अत्तर निर्माण करण्यासाठी याची एक दीर्घ आणि जटिल प्रक्रिया आहे. याकरता एक्वीलेरिया वृक्षाच्या लाकडाला धातूच्या तप्त छडीने किंवा ड्रिलच्या मदतीने अनेक छिद्रं पाडली जातात. या छिद्रांमध्ये खास फंगस इंजेक्ट केला जतो. हा फंगस वृक्षाच्या आत फैलावतो. या फंगसला शत्रू समजून वृक्ष स्वत:च्या रक्षणासाठी डार्क ब्लॅक कलरचे रेजिन निर्माण करण्यास सुरु करतो.

लाकडाचा वापर

हे रेजिन हळूहळू वृक्षाच्या लाकडाला अगरवुडमध्ये बदलते. याचे लाकूड मिळविल्यावर याचा वापर अत्तर निर्माण करण्यासाठी केला जातो. या लाकडाच्या गोंदाद्वारे ऑड ऑइल मिळविले जाते. हे एक खास पद्धतीचे एशेंशियल ऑइल असुन त्याचा वापर केवळ परफ्यूम निर्माण करण्यासाठी केला जातो. सद्यकाळात या तेलाची किंमत 25 लाख रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिक आहे. याचबरोबर कोरियता या रोपाचा वापर औषधी मद्य निर्मिती आणि अरबजगतात याचा वापर अत्तर निर्मितीसाठी केला जातो. भारतात हा वृक्ष सर्वसाधारणपणे आसाममध्ये आढळतो, आसामला अगरवुड कॅपिटल ऑफ इंडिया म्हटले जाते.

सुगंधाला तोड नाही

मध्यपूर्वेच्या देशामंध्ये या लाकडाच्या छोट्या हिस्स्याला पाहुणचारासाठी जाळले जाते. याचबरोबर कपडे आणि परफ्युमच्या स्वरुपात देखील याचा वापर केला जातो. अगरवुडची शेती करणाऱ्या लोकांनुसार याच्या धूपची बरोबरी जगातील कुठलेच सेंट करू शकत नाही. हा धूप जाळल्यावर याचा एक सुगंध येतो, याचा किंचित धूर एका बंद खोलीला किमान 4-5 तास सुगंधित ठेवू शकतो. परंतु आता वेगवेगळ्या कारणांमुळे या वृक्षांची संख्या कमी होत चालली आहे.

अस्तित्व धोक्यात

जे वृक्ष शिल्लक राहिले आहेत, त्यांच्यात नैसर्गिक पद्धतीने फंगल इंफेक्शनचा दर कमी झाला आहे. शिल्लक झाडांपैकी केवळ 2 टक्के झाडांमध्येच नैसर्गिक स्वरुपात असे घडते असे तज्ञांचे सांगणे आहे. उर्वरित फंगल इंफेक्शन कृत्रिम पद्धतीने निर्माण केले जाते. नॅचरल अगरवुडच्या तुलनेत याची गुणवत्ता कमी असते. नॅशनल अगरवुड कृत्रिमच्या तुलनेत 100 पट महाग आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article