सिंधुकन्या पूर्वा गावडेने फडकवला खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राचा झेंडा
दिव येथील समुद्रात 10 किमी अंतर 2 तास 33 मिनिटात पार करत पटकावले ब्राँझ मेडल
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
दिव येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया सागरी जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गची कन्या पूर्वा संदीप गावडे हिने महाराष्ट्राचा झेंडा फडकवला आहे. तिने दिव समुद्रात 10 किलोमीटरचे अंतर 2 तास 33 मिनिटात पार करत तिसरा क्रमांक मिळवून ब्राँझ मेडल पटकावले आहे . याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिंधुदुर्गनगरी येथील पूर्वा गावडे सध्या पुणे बालेवाडी येथे प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणचे प्रशिक्षण घेत असून आतापर्यत तीने राज्य व राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करत अनेक पदके मिळविली आहेत. या कामगिरीच्या जोरावरच तिची खेलो इंडिया मध्ये सागरी जलतरण स्पर्धेत 10 व 5 किलोमीटर स्पर्धेसाठी निवड झाली. त्यानंतर आज बुधवारी दिव येथील समुद्रात झालेल्या 10 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत समुद्रात 10 किलोमीटरचे अंतर 2 तास 33 मिनिटात पार करत तिसरा क्रमांक मिळवून ब्राँझ मेडल पटकावले आहे. गुरुवारी ती 5 किलोमीटर साठी सुद्धा समुद्रात उतरणार आहे. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय जलतरण संघटनेचे सेक्रेटरी राजू पालकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पूर्वाच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस,सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावाचे प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांनी खास अभिनंदन केले आहे .