For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिला विश्वचषक कांगारुंकडे....

06:01 AM Jul 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
महिला विश्वचषक कांगारुंकडे
Advertisement

क्रिकेटचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलियन महिलांनी इंग्लंडवर 7 गड्यांनी मात केली आणि टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले.

Advertisement

आत्तापर्यंत खेळलेल्या 10 पैकी 7 वेळा ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाचा मान मिळविला आहे. ही नेत्रदीपक कामगिरी म्हणावी लागेल. स्पष्ट सांगायचं तर इंग्लंडविरुद्धचा हा सामना एकतर्फी झाला. विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अटीतटीचा होणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 150 धावावर रोखले आणि इथेच इंग्लंडने अर्धी लढत गमावली. इंग्लंडकडून सिव्हर ब्रंट (58), केम्प (44) आणि कॅप्सी (22) यांनी डावास आकार देण्याचा प्रयत्न केला. परंतु इंग्लंड फलंदाजानी अतिशय संथ खेळ केला. विशेषत: पॉवरप्लेमध्ये त्यांनी वेगाने धावा न केल्याने त्यांच्यावर बाजू उलटल्याचे पाहायला मिळाले.

ऑस्ट्रेलियाने सलामीची फलंदाज लिची व्हॉलची विकेट स्वस्तात गमावली. पण इंग्लंडचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. बेथ मुनी (64) आणि लिचफिल्ड (48) यांनी दमदार फलंदाजी केली. मैदानात चौफेर फटकेबाजी करून त्यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली. परिणामी कांगारुनी 3 खेळडूंच्या मोबदल्यात 153 धावा करून लक्ष्य प्राप्त केले. बेथ मुनी हिला प्लेयर ऑफ द मॅच व प्लेयर ऑफ द टूर्नामेंट घोषित करण्यात आले. खेळाच्या वेळी ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडीयम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते.  महिलांच्या क्रिकेट सामन्यासाठी देखील प्रचंड गर्दी होत आहे ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.

Advertisement

सोमवारी भारत व इंग्लंड यांच्यात टी-20 सामना होणार असून त्याच्या तयारीसाठी दुपारी कडक उन्हात भारतीय खेळाडूंनी कसून सराव केला.

Advertisement
Tags :

.