For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिला टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर

06:41 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
महिला टी 20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर
Advertisement

इंग्लंडमध्ये 12 जून ते 5 जुलैपर्यंत रंगणार स्पर्धा : 12 संघांचा समावेश : भारत-पाक 14 जूनला पुन्हा आमनेसामने

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीने इंग्लंडमध्ये जून महिन्यात होणाऱ्या महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळपत्रकाची घोषणा मंगळवारी केली. यजमान इंग्लंड वि श्रीलंका लढतीने 12 जूनला या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे 10 वे पर्व 12 जून ते 5 जुलै या कालावधीत 12 संघांच्या समावेशात पार पडणार आहे.

Advertisement

आयसीसीच्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. पहिल्या गटात एकत्र असल्यामुळे पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना 14 जून रोजी खेळवला जाणार आहे. दरम्यान, या वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता निश्चित करणारे बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड व नेदरलँड्स हे अंतिम चार संघ ठरले आहेत.

अ गटात ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश व नेदरलँड्स यांचा समावेश आहे, तर ब गटात यजमान इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज, आयर्लंड व स्कॉटलंड आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्ड्सवर 5 जुलै रोजी होणार आहे. 10 संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. या दोन्ही गटातून 2-2 अव्वल संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. विशेष म्हणजे, महिला टी-20 विश्वचषकात एका दिवशी तीन सामने खेळवले जाणार आहेत.

आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक

  1. शुक्रवार 12 जून: इंग्लंड वि श्रीलंका, एजबॅस्टन
  2. शनिवार 13 जून: स्कॉटलंड वि आयर्लंड, ओल्ड ट्रॅफर्ड
  3. शनिवार 13 जून: ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका, ओल्ड ट्रॅफर्ड
  4. शनिवार 13 जून: वेस्ट इंडिज वि न्यूझीलंड, हॅम्पशायर
  5. रविवार 14 जून: बांगलादेश वि नेदरलँड्स, एजबॅस्टन
  6. रविवार 14 जून: भारत वि पाकिस्तान, एजबॅस्टन
  7. मंगळवार 16 जून: न्यूझीलंड वि श्रीलंका, हॅम्पशायर
  8. मंगळवार 16 जून: इंग्लंड वि आयर्लंड, हॅम्पशायर
  9. बुधवार 17 जून: ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश, हेडिंग्ले
  10. बुधवार 17 जून: भारत वि नेदरलँड्स, हेडिंग्ले
  11. बुधवार 17 जून: दक्षिण आफ्रिका वि पाकिस्तान, एजबॅस्टन
  12. गुरुवार 18 जून: वेस्ट इंडिज वि स्कॉटलंड, हेडिंग्ले
  13. शुक्रवार 19 जून: न्यूझीलंड वि आयर्लंड, हॅम्पशायर
  14. शनिवार 20 जून: ऑस्ट्रेलिया वि नेदरलँड्स, हॅम्पशायर
  15. शनिवार 20 जून: पाकिस्तान वि बांगलादेश, हॅम्पशायर
  16. शनिवार 20 जून: इंग्लंड वि स्कॉटलंड, हेडिंग्ले
  17. रविवार 21 जून: वेस्ट इंडिज वि श्रीलंका, ब्रिस्टल
  18. रविवार 21 जून: भारत वि. दक्षिण आफ्रिका, ओल्ड ट्रॅफर्ड
  19. मंगळवार 23 जून: न्यूझीलंड वि स्कॉटलंड, ब्रिस्टल
  20. मंगळवार 23 जून: श्रीलंका वि आयर्लंड, ब्रिस्टल
  21. मंगळवार 23 जून: ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान, हेडिंग्ले
  22. बुधवार 24 जून: इंग्लंड वि वेस्ट इंडिज, लॉर्ड्स
  23. गुरुवार 25 जून: भारत वि बांगलादेश, ओल्ड ट्रॅफर्ड
  24. गुरुवार 25 जून: दक्षिण आफ्रिका वि नेदरलँड्स, ब्रिस्टल
  25. शुक्रवार 26 जून: श्रीलंका वि स्कॉटलंड, ओल्ड ट्रॅफर्ड
  26. शनिवार 27 जून: पाकिस्तान वि नेदरलँड्स, ब्रिस्टल
  27. शनिवार 27 जून: वेस्ट इंडिज वि आयर्लंड, ब्रिस्टल
  28. शनिवार 27 जून: इंग्लंड वि न्यूझीलंड, द ओव्हल
  29. रविवार 28 जून: दक्षिण आफ्रिका वि बांगलादेश, लॉर्ड्स
  30. रविवार 28 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, लॉर्ड्स
  31. मंगळवार 30 जून: (सेमीफायनल 1), द ओव्हल
  32. गुरुवार 2 जुलै: (सेमीफायनल 2), द ओव्हल
  33. रविवार 5 जुलै: (फायनल), लॉर्ड्स

Advertisement
Tags :

.