महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वेध सुरू
दुबईनंतर ‘ट्रॉफी टूर’ बेंगळूरमध्ये दाखल, 10 रोजी मुंबईत
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेला आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी बाकी असून सदर विश्वचषकाच्या भ्रमंतीसह स्पर्धेचा प्रवास अधिकृतपणे सुरू झाला आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियमवरील स्पर्धेच्या सुऊवातीच्या सामन्यास 30 दिवस असताना 3 सप्टेंबर रोजी ट्रॉफी टूरने दुबई पालथी घालून आपली छाप पाडली.
दुबईमधील 24 तासांच्या नेत्रदीपक प्रवासात हाफ डेझर्ट दुबई, दुबई फ्रेम, म्युझियम ऑफ दि फ्युचर आणि चित्तथरारक दुबई सनराईज यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी थांबा घेण्यात आला. दुबईच्या ग्लॅमरनंतर विश्वचषकाचा भारतातील दौरा 6 रोजी बेंगळूर येथील या खेळातील तऊण महिला प्रतिभांना चालना देणाऱ्या ‘कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिकेट’मधून सुरू झाला आहे.
10 सप्टेंबर रोजी हा चषक मुंबईला रवाना होईल. त्यापूर्वी चाहत्यांना आज 7 आणि उद्या 8 सप्टेंबर रोजी नेक्सस मॉल, बेंगळूर येथे, तर 14 आणि 15 सप्टेंबर रोजी इन्फिनिटी मॉल, मालाड, मुंबई येथे ट्रॉफीची झलक पाहण्याची संधी मिळेल. भारताच्या दौऱ्यानंतर स्पर्धेच्या उद्घाटनासाठी संयुक्त अरब अमिरातला परतण्यापूर्वी ट्रॉफी टूर श्रीलंका आणि बांगलादेशचा प्रवास करेल.