महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नेदरलँड्सला महिला हॉकीचे सुवर्ण

06:51 AM Aug 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबेस

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत शुक्रवारी उशिरा झालेल्या अंतिम सामन्यात नेदरलँड्सच्या महिला हॉकी संघाने चीनचा पराभव करत सुवर्णपदक स्वत:कडे राखले. नेदरलँड्सने अंतिम सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये 2-1 अशा गोलफरकाने जिंकला. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी या क्रीडा प्रकारात नेदरलँड्सने आपले निर्विवाद वर्चस्व राखताना पुरुष आणि महिलांच्या विभागातील सुवर्णपदके मिळविली.

Advertisement

1980 साली ऑलिम्पिक स्पर्धेत महिला हॉकी क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर या क्रीडा प्रकारात नेदरलँड्सच्या पुरुष आणि महिला संघांची कामगिरी दिवसेंदिवस अधिकच दर्जेदार झाली. हॉकीमध्ये पुरुष आणि महिलांच्या विभागातील सुवर्णपदके मिळविणारा 1980 नंतर नेदरलँड्सचा देश हा पहिला ठरला आहे.

चीन आणि नेदरलँड्स यांच्यातील झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या चेन यी हिने नेदरलँड्सची बचावफळी तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत गोल केला. नेदरलँड्स संघाने खेळाच्या पहिल्या 3 सत्रांमध्ये गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविला यामध्ये एका पेनल्टी कॉर्नरचा समावेश आहे. निर्धारित कालावधी संपण्यास केवळ 5 मिनिटे बाकी असताना जेनसेनने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून नेदरलँड्सला बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिल्याने पंचांनी पेनल्टी शुटआऊटचा वापर केला. नेदरलँड्सतर्फे सँडर्स, व्हर्सचुर आणि व्हेन यांनी गोल नोंदविले. 2021 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नेदरलँड्सच्या महिला हॉकी संघाने सुवर्णपदक पटकाविले. गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत नेदरलँड्स आणि चीन महिला संघांमध्ये एकूण 21 सामने झाले आणि त्यामध्ये एकही सामना चीनला जिंकता आलेला नाही. महिला हॉकी या क्रीडा प्रकारात अर्जेंटिनाने कांस्यपदक मिळविताना बेल्जियमचा पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभव केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article