महिला फुटबॉल सामना बरोबरीत
06:53 AM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
Advertisement
स्वीडनच्या दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या 20 वर्षांखालील वयोगटाच्या महिला फुटबॉल संघाने स्वीडीश क्लबबरोबरचा मित्रत्वाचा फुटबॉल सामना 1-1 असा बरोबरीत राखला.
भारतीय महिला फुटबॉल संघ व स्वीडनच्या इनस्केडी आयके डॅम यांच्यातील हा मित्रत्वाचा सामना आयोजित केला होता. या लढतीमध्ये 44 व्या मिनिटाला एन. सिबानीदेवीने भारतीय महिला संघाचे खाते उघडले. पण, 88 व्या मिनिटाला इनस्केडी क्लबने गोल नोंदवून हा सामना बरोबरीत राखला. स्वीडनच्या दौऱ्यामध्ये भारतीय महिला फुटबॉल संघाने केवळ एकमेव सामना जिंकला आहे तर दोन सामने गमविले आहेत.
Advertisement
Advertisement