For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गॅरंटी योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण

10:41 AM Mar 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
गॅरंटी योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन : बेंगळुरात डोहाळे जेवण कार्यक्रम

Advertisement

बेंगळूर : आमचे सरकार महिला सक्षमीकरणासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. महिला आत्मसन्मानाने जगू शकतील हे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने गृहलक्ष्मी आणि शक्ती योजना लागू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बेंगळूरच्या लग्गेरे येथील बसवेश्वर भवनमध्ये काँग्रेस नेते लग्गेरे नारायणस्वामी यांच्या वाढदिनी 208 महिलांसाठी आयोजित डोहाळे जेवण कार्यक्रम आणि मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान आणि शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या. महिला आज स्वतंत्र निर्णय घेण्याइतक्मया सक्षम झाल्या आहेत.

स्त्रीने एका निरोगी आणि समाजात उच्च स्थान मिळविणाऱ्या मुलाला जन्म द्यावा. महिला आणि बालविकास खात्याद्वारे स्त्री गर्भवती झाल्यानंतर, जन्मलेल्या मुलाची वयाच्या 6 वर्षांपर्यंत सरकार जबाबदारी घेते. गर्भवती महिला आणि बाळाला पौष्टिक आहार दिला जात आहे, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नारायणस्वामी यांनी गरीब आणि भुकेल्यांना मदत करत आहेत. मी त्यांच्या कार्याने प्रेरित झालो आहे. असे कार्यक्रम ते राजकारणासाठी नाही तर सामाजिक जाणिवेतून करत आहेत. चांगले कार्य करणाऱ्या नारायणस्वामींच्या परिवाराला आशीर्वाद मिळो. मी दरवषी बेळगावच्या ग्रामीण भागात सामूहिक डोहाळे जेवण कार्यक्रम राबवत आहे. गेल्या 7 वर्षांपासून हे काम करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.