बांद्यात 19 सप्टेंबरला महिला रोजगार मार्गदर्शन मेळावा
प्रतिनिधी
बांदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निम्मित सेवा पंधरवडा आणि विकास दिवसाचे औचित्य साधून,भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सिंधुदुर्ग आयोजित महिला रोजगार मार्गदर्शन मेळावा दिनांक शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी बांदा मंडल मध्ये बांदा जिल्हा परिषद व इन्सुली जिल्हा परिषद स्तरावर महिला मेळावा आनंदी मंगल कार्यालय बांदा येथे संध्याकाळी ठीक 3:30 वाजता, आयोजित करण्यात आला आहे.मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सदस्य, लघु सुष्म, मध्यम मंत्रालय श्री विजय प्रताप केनवडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन महिलांना मिळणार आहे. तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष श्री मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस श्री महेश सारंग, जिल्हा संयोजक श्री प्रसन्ना देसाई, जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रमोद कामत ,बेसिकचे मंडळ अध्यक्ष महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष आणि महिला मोर्चा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा मार्गदर्शन सोहळा संपन्न होणार आहेतरी त्या त्या विभागातील महिलांनी, महिला बचत गट आणि इच्छुक महिलांनी या संधीचा फायदा करून घ्यावा आणि उद्योग धंद्यामध्ये आपली उन्नती साधावी असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ श्वेता कोरगावकर यांनी केले आहे.