मराठा जागृती निर्माण संघाच्यावतीने महिला दिन
11:40 AM Mar 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : मराठा जागृती निर्माण संघाच्यावतीने महिला दिनाचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून लिओ इंजिनिअरिंगच्या एमडी प्रियांका कळसकर उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी जागृती संघाच्या महिला प्रमुख प्रा. विद्या तोपिनकट्टी उपस्थित होत्या. दिव्या वेर्णेकर, माया अग्रवाल, प्रेमा तेलंग, स्नेहा नेतलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. लक्ष्मी नेतलकर, सुमन बर्गे, शीतल कामुले, रूपा वेर्णेकर, पद्मा पाऊसकर या ज्येष्ठ महिलांचा तसेच सीए वनिता बिर्जे यांचा सत्कार करण्यात आला. गोपाळराव बिर्जे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. शंकर पाटील यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला. गोपी बाळेकुंद्री यांनी आभार मानले. यावेळी शुभदा बाळेकुंद्री, वर्षा बिर्जे आदी उपस्थित होत्या.
Advertisement
Advertisement