For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विविध ठिकाणी महिला दिन उत्साहात

10:12 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
विविध ठिकाणी महिला दिन उत्साहात
Advertisement

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisement

म. ए. समिती महिला आघाडी

महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्यावतीने शनिवारी मराठा मंदिर सभागृहात महिला दिनाचे आयोजन केले होते. व्यासपीठावर महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, उपाध्यक्षा सुधा भातकांडे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून मराठा मंदिरच्या संचालिका व जिजामाता बँकेच्या चेअरपर्सन भाविका होनगेकर उपस्थित होत्या. या निमित्त महिलांसाठी पाककला व रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी सुहाना मसालाचे कर्नाटक प्रमुख संतोष डोंबे व एरिया सेल्स मॅनेजर सुरेश जाधव यांचे सहकार्य मिळाले. प्रास्ताविक करताना रेणू किल्लेकर यांनी महिलांना स्वावलंबी करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून प्रत्येक महिलेने व्यवसायामध्ये उतरावे, असे आवाहन केले. भाविका होनगेकर यांनी सर्व महिलांना बचतीचे धडे दिले. पाककला स्पर्धेसाठी धनश्री हलगेकर व रूपांजली भोसले तर रांगोळी स्पर्धेसाठी सुचिता पाटील व अपर्णा मोहिते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. शंभरहून अधिक महिलांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. विजेत्या महिलांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. अर्चना देसाई यांनी ईशस्तवन सादर केले. प्रिया कुडची यांनी सूत्रसंचालन केले. कांचन भातकांडे यांनी आभार मानले. फ्राईड राईस या पाककला स्पर्धेत प्रथम आरती रायकर, द्वितीय ज्योती मेणसे, तृतीय मधुरा चौगुले, उत्तेजनार्थ निकिता मेणसे, ऋतुजा पाटील, शौरी हौशीकर, आशा सुपली, सुजाता माने, तनुजा वागराळे, गीता उंदरे, सुनीता प्रसादी, रोहिणी पतंगे, सीमा मेणसे, सुवर्णा कणबरकर, शेजवान नूडल्स- प्रथम आकांक्षा देसाई, द्वितीय भाविका नवखंडकर, तृतीय सुयेशा पाटील, रांगोळी स्पर्धा- प्रथम गीता हुंदरे, द्वितीय रितू शिंदोळकर, तृतीय सुश्मिता सांबरेकर यांनी क्रमांक पटकाविले.

Advertisement

जायंट्स सखीकडून महिलांचा सन्मान

दरवषी जायंट्स सखी 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील निवडक महिलांचा सन्मान करत असते. या वषी अशा महिला निवडण्यात आल्या ज्या महिलांना कुणाचाही पाठिंबा, आधार नसताना त्यांनी केवळ स्वबळावर आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले आणि ती मुले चांगल्या पदावर कार्यरत आहेत. आपल्या कष्टाचे सार्थक झाल्याची भावना सुचिता घोटगेकर यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. एक स्त्री शिकली तर एक कुटुंब सुशिक्षित होते आणि एक कुटुंब शिकलं तर देशाचे उत्तम नागरिक तयार होतात, यात स्त्रीची भूमिका खूप महत्त्वाची असते, असे उद्गार अध्यक्षीय भाषणात अपर्णा पाटील यांनी व्यक्त केले. ज्योती अनगोळकर यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला सर्व सखी उपस्थित होत्या. शितल पाटील यांनी आभार मानले.

सुभाषचंद्रनगर महिला मंडळ

सुभाषचंद्रनगर येथील महिला मंडळातर्फे समुदाय भवन येथे महिला दिनानिमित्त वयाची सत्तरी पार केलेल्या पंधरा महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पुष्पा पाटील, कुंदा इजारे, नलुताई धोंड, सरिता तेंडुलकर, वंदना चौगुले, अमिता आंबे, लता गांगोडकर, प्रतिभा हत्तरगी, आशा हत्तरगी, मलप्रभा डुकरे, सुनंदा बोकडे, संजीवनी शहापूरकर, सुलभा कुट्रे, माई उचगावकर, सुलोचना कंग्राळकर या महिलांचा समावेश होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सत्कारास येऊ न शकलेल्या महिलांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला. प्रारंभी अर्चना खणगावकर यांनी स्वागत केले. राधिका तेंडुलकर यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगून स्त्राrशक्तीवर कविता सादर केली. यानंतर विविध खेळ घेण्यात आले. पुढील वर्षाच्या कार्यकारिणीमध्ये रेश्मा, शिवानी व सोनम करडे यांची निवड करण्यात आली. अस्मिता गुरव यांनी आभार मानले.

सिद्धी महिला मंडळ

महात्मा गांधी रोड, टिळकवाडी येथील सिद्धी महिला मंडळाच्यावतीने सिद्धिविनायक मंदिरात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस निरीक्षक कलावती चंदावरकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदा हजारे, शिक्षिका सडेकर व सुतार उपस्थित होत्या. प्रमोदा हजारे यांनी महिलांना स्वसंरक्षणाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता पाटील यांनी केले. सुनीता सुभेदार यांनी आभार मानले. यावेळी अश्विनी गोडसे, अनुजा कारेकर, सुरेखा दळवी, पल्लवी, रितू, स्वाती जाधव, उर्मिला, सुधा तवणोजीचे व महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.

जेपीएफ मेटाकास्ट प्रा. लि. मच्छे

जेपीएफ मेटाकास्ट प्रा. लि. मच्छेतर्फे महिला कर्मचाऱ्यांसोबत महिला दिन साजरा करण्यात आला. कंपनीचे संचालक गौरव पंडित उपस्थित होते. कंपनीचे सुरक्षा अधिकारी एस. व्ही. कदम यानी सूत्रसंचालन करत महिला दिनाची सुऊवात कशी व का झाली याचे महत्त्व सांगितले. कंपनीचे संचालक प्रकाश पंडित यांनी कंपनीत महिला कर्मचारी आपल्या कुटुंबाला जसे सांभाळून घेऊन काम करता त्याचप्रमाणे कंपनीतही काम करत असता त्याबद्दल सर्व महिलांचे अभिनंदन केले. आत्तापर्यंत कंपनीतील नियमांचे पालन करत आलात त्याचप्रमाणे नवीन भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वेळोवेळी सुरक्षिततेची जाणीव करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

आझाद गल्ली येथे महिला दिन उत्साहात

आझाद गल्ली येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध खेळ घेण्यात आले व विजेत्या महिलांना नगरसेवक ज्योती कडोलकर व मंजुश्री हावण्णावर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. तसेच क्रीडापटू राजवीर बडमंजी, प्रथमेश मोळे, प्रियांका राजपूत, निलम माळी यांनाही पदक देण्यात आले. राजश्री राजपूत व रुक्सार शहापूरकर, नसरीन मुल्ला यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :

.