For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेदांत फौंडेशनतर्फे महिला दिन उत्साहात

10:05 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
वेदांत फौंडेशनतर्फे महिला दिन उत्साहात
Advertisement

बेळगाव : जग कुठे घेऊन जायचं हे फक्त स्त्रीच्या हातात असतं. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. महिला प्रामाणिकपणे प्रत्येक क्षेत्रात काम करत असतात. महिलांच्या संघर्षाची जाणीव ठेवून त्यांना योग्य तो सन्मान देत महिला दिन साजरा केला पाहिजे, असे उद्गार अॅड. सुरेश देसाई यांनी काढले. वेदांत र्फौडेशनच्या महिला दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बिजगर्णी ग्राम पंचायतचे अध्यक्ष मनोहर बेळगावकर, उद्घाटक म्हणून अॅड. सुरेश देसाई, मण्णूर येथील युवा काँग्रेस नेते जयवंत बाळेकुंद्री, प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. डी. एन. मिसाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून टिळकवाडी ग्रंथालयाचे ग्रंथपाल संजय कुलकर्णी, तालुका पंचायत माजी अध्यक्षा रिता बेळगावकर, एन. एस. गाडेकर, जयश्री पाटील, बेळवट्टी हायस्कूलचे आर. बी. देसाई, कणबर्गीचे समाजसेवक अऊण मुचंडीकर, ठळकवाडी हायस्कूलचे सी. वाय. पाटील, दिगंबर पाटील, सुनील देसुरकर, सुशीला गुरव, अस्मा नाईक, शिक्षक सुनील पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सेव्रेटरी ईश्वर पाटील आणि आभार उपाध्यक्ष एन. डी. मादार यांनी मानले. प्रा. डॉ. डी. एन. मिसाळे म्हणाले, स्त्री आणि पुऊष हे दोघेही एकमेकाला पूरक असून जगाच्या विकासामध्ये महत्त्वाचे भाग आहेत. परंतु महिलांवर अधिक जबाबदारी असल्याने त्यांचा आदर केला पाहिजे. यानिमित्त दहा वेगवेगळ्या प्रकारातील स्पर्धा घेण्यात आल्या. लोटस ऑर्चिड येथे हा कार्यक्रम झाला.यावेळी पहिल्या क्रमांकाच्या 10 महिलांना पैठणी साडी, दुसऱ्या क्रमांकाच्या 10 महिलांना प्रेशर कुकर तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या 10 महिलांना भांड्यांचा सेट देण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :

.