राणी चन्नम्मानगरात महिला दिन साजरा
11:09 AM Mar 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राणी चन्नम्मा नगरातील योग सभागृहात महिलांना गौरविण्यात आले. योग शिक्षक अरुण पुणेकर व श्रीमती पुणेकर यांचा यावेळी गौरव करण्यात आला. शिक्षणाधिकारी ए. एम. जयश्री यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर सुरेश कल्याणशेट्टी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा उद्देश सांगितला. यावेळी योग साधक महिला व पुरुष उपस्थित होते.
Advertisement
Advertisement