महिला आघाडीच्यावतीने महिला दिन साजरा
प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी महापौर सरिता पाटील, माजी नगरसेविका सुधा भातकांडे व बीएसएफमध्ये भरती झालेल्या रोशनी मुळीक यांचा सत्कार करण्यात आला. सरिता पाटील यांची कन्या डॉ. वृथा पाटील यांनी नुकतेच एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्याबद्दल तसेच सुधा भातकांडे यांची ताराराणी सोसायटीच्या चेअरपर्सन म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर म्हणाल्या, महिलांनी भविष्याचा विचार करून बचत करणे गरजेचे आहे. कुटुंबासोबत आपल्या आरोग्याकडेही त्यांनी लक्ष द्यावे, काही क्षण आपल्यासाठी जगता यावेत, आपल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी थोडा वेळ काढावा, असा सल्ला महिलांना दिला. वैष्णवी मुळीक यांनी तऊणींना मार्गदर्शन केले. मुलींना त्यांच्या कलेनुसार शिक्षण घेण्याची मुभा दिली पाहिजे. मुलगा-मुलगी असा भेद करू नये, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रिया कुडची यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अर्चना कावळे यांनी करून दिला. मंजुश्री कोळेकर यांनी आभार मानले. यावेळी आशा सुपली, रेखा गोजगेकर, दीपा मुतकेकर, अनुपमा कोकणे, श्रेया मंडोळकर, राजश्री बडमंजी, शालिनी पाटील यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.