For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिजाऊ महिला मंडळातर्फे महिला दिन

10:07 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिजाऊ महिला मंडळातर्फे महिला दिन
Advertisement

बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील जिजाऊ महिला मंडळातर्फे महिला दिन आणि मंडळाचा 35 वा वर्धापन दिन असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी चंद्रभागा सांबरेकर होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. ज्योती मजुकर उपस्थित होत्या. प्रारंभी अनिता शंभुचे यांनी प्रास्ताविक केले. मान्यवर आणि पंच मंडळींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अंजना शंभुचे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सुनीता शंभुचे यांनी कार्यक्रमाचा आढावा घेतला. प्रा. ज्योती मजुकर यांचे स्वागत सांबरेकर यांच्या हस्ते केले. यावेळी त्या म्हणाल्या, समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता व समाधान या पंचसुत्रीवर स्त्रियांनी आचरण केल्यास जीवन यशस्वी होऊ शकते. आपण कुटुंबाबरोबरच समाजासाठीही काम करायला हवे, असे त्यांनी सांगितले. यानंतर गल्लीतील पंचमंडळीतर्फे मालोजी अष्टेकर यांनी जिजाऊ मंडळाच्या कार्याची प्रशंसा केली. मंडळातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. त्यांची नावे आदिती पवार यांनी वाचली. निलम बडवाण्णाचे यांनी स्त्री महिमा या विषयावर मनोगत व्यक्त केले. शरद पाटील यांनी मंडळासाठी नामफलक आणि साऊंड सिस्टीम देण्याचे आश्वासन दिले. सूत्रसंचालन वीणा हुंद्रे यांनी केले तर आभार डॉ. स्वाती खंडागळे यांनी मानले. पंच बाबुराव कुट्रे व कविता हुंद्रे यांनी अल्पोपाहाराची सोय केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.