For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

58 जिल्ह्यांमध्ये महिलांचे योगदान पोहचले 40 टक्क्यांवर

06:35 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
58 जिल्ह्यांमध्ये महिलांचे योगदान पोहचले 40 टक्क्यांवर
Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

सांख्यिकी व अंमलबजावणी कार्यक्रम मंत्रालयांतर्गत नुकताच भारतातील पहिला वहिला जिल्हावार नोकर भरतीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या नोकर भरतीच्या अहवालात 58 जिल्ह्यांमध्ये महिलांचे प्रमाण 40 टक्क्यांवर पोहचले असल्याचे दिसून आले आहे.

बेरोजगारीचे प्रमाण

Advertisement

दुसरीकडे 78 टक्के जिल्ह्यांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 0.5 टक्के आणि 5.5 टक्के इतके राहिले आहे. हे प्रमाण 15 वर्षे व त्dयावरील उमेदवारांचे आहे. यापैकी 43 टक्के जिल्ह्यांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 0.5 ते 3 टक्के, 34 टक्के जिल्ह्यांमध्ये 3 ते 5.5 टक्के राहिले होते. फक्त 7.2 टक्के जिल्ह्यांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 0.4 टक्क्यापेक्षा कमी राहिले होते. 14 टक्के जिल्ह्dयांमध्ये हे प्रमाण 5.5 टक्केपेक्षा अधिक होते.

महिलांना संधी

जवळपास 57 टक्के जिल्ह्यांमध्ये महिलांचा सहभाग दर 40 टक्के किंवा जास्त होता. यातही हमीरपूर, हिमाचल प्रदेशात महिलांचे प्रमाण सर्वाधिक 80 टक्के इतके नोंदले गेले होते.

Advertisement
Tags :

.