कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रत्नागिरीत ४६ ग्रामपंचायतींवर 'महिला राज'

11:58 AM Jul 15, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

तालुक्याच्या ग्रामीण राजकीय पटलावर आगामी पाच वर्षांसाठी महिलांचा दबदबा राहणार आहे. सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सोमवारी जाहीर झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ४६ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित झाले आहे. ज्यामुळे अनेक गावांमध्ये उत्साहाचे तर काही ठिकाणी राजकीय समीकरणांची नव्याने जुळवाजुळव सुरू झाली आहे.

Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता ही सोडत काढण्यात आली रत्नागिरी तहसील कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात तहसीलदार राजाराम म्हात्रे आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. मार्वी रवींद्र चव्हाण या मुलीने चिठ्ठ्या उचलून आरक्षण निश्चित केली. सोडतीवेळी विविध गावांतील संभाव्य उमेदवार, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या आरक्षण सोडतीमुळे तालुक्यातील निम्म्या ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनुसूचित जाती (स्त्री) या प्रवर्गाअंतर्गत दोन ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच विराजमान होणार आहेत. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री) या प्रवर्गासाठी सर्वाधिक १३ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण (स्त्री) या प्रवर्गात सर्वात जास्त, तब्बल ३१ ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.

महिलांप्रमाणेच उर्वरित ४८ जागांवर विविध प्रवर्गातील पुरुष उमेदवार सरपंच म्हणून काम पाहतील. त्यात तीन ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील पुरुष सरपंच असतील. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या प्रवर्गासाठी १३ ग्रामपंचायती आरक्षित आहेत. सर्वसाधारणः उर्वरित ३२ ग्रामपंचायती सर्वसाधारण गटासाठी खुल्या असणार आहेत. या आरक्षण सोडतीमुळे गावागावांतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे, तर अनेक गावांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सन २०२५ ते २०३० या पाच वर्षाच्या कालावधीसाठी हे आरक्षण लागू असणार आहे. या सोडतीमुळे अनेक प्रस्थापित नेत्यांना संधी गमवावी लागली आहे, तर अनेक गावांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, ज्यामुळे गावागावांतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनुसूचित जाती (स्त्री):  कशेळी आणि वाटद

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री): गावडेआंबेरे, पाली, खरवते, रिळ, कापडगाव, हातखंबा, पोमेडीखुर्द, साखर मोहल्ला, मिऱ्या, कोळंबे, जयगड, खालगांव आणि दांडेआडोम

सर्वसाधारण (स्त्री): काळबादेवी, देऊड, चांदेराई, तरवळ, शिवारआंबेरे, विल्ये, नाचणे, नाणीज, बोंडे, टेंग्ये, टिके, सत्कोंडी, वळके, वेतोशी, वरवडे, गावखडी, खेडशी, मिरजोळे, खानु, कोतवडे, गहनरळ, मजगाव, लाजुळ, सैतवडे, फणसवळे, नेवरे, डोर्ले, पिरंदवणे, जांभरुण, जांभारी, धवे आणि चाफेरी

अनुसूचित जाती: घामणसे, हरचेरी आणि कुरतडे

नागरिकांचा मागासवर्ग : मेर्वी, कळझोंडी, निवळी, उक्षी, पावस, चाफे, माट्ये, चरवेली, नाखरे, आगरनरळ, मावळंगे, शिरगाव आणि पानवल.

सर्वसाधारणः सडामिऱ्या, राई, गणपतीपुळे, गुंबद, चांदोर, निवेंडी, करबुडे, नेरुळ, बसणी, साउरे, मालगुंड, कुवारबाव, वेळवंड, कासारवेली, तोणदे, सोमेश्वर केळये, गणेशगुळे, पूर्णगड, कासारी, फणसोप, चिंद्रवली, झरेवाडी, रानपाट, भगवतीनगर, ओरी, भोके, गोळप, नांदिवडे, पोमेंडी बुद्रुक आणि कर्ता.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article