अनगोळ येथे महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान
11:38 AM Mar 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : अनगोळ येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आदिनाथ भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेविका खुर्शिदा मुल्ला यांच्यावतीने सफाई महिला कर्मचारी व ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर अनुराधा मुतालिक, विजयालक्ष्मी नायकर, अनिता देशपांडे, सुनीता हणमण्णावर, जयश्री माळगे, डॉ. शोभा रेवण्णवर, रंजना बापशेट, महिला बाल कल्याण विभागाचे राममूर्ती, टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक परशुराम पुजारी, बसम्मा मलकण्णवर, सुवर्णा पाटील, लक्ष्मी रोकडे आदी उपस्थित होते. नदीम मुल्ला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अश्विनी बोंगाळे, शांता मुतगेकर, गीता पाटील, मीना मुतगेकर यांनी स्वागतगीत सादर केले. नगरसेविका खुर्शिदा मुल्ला यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील महिलांचा सत्कार झाला.
Advertisement
Advertisement