For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिलावर्ग रोहयोत गर्क तर शेतकरी पेरणीच्या चिंतेत

10:08 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
महिलावर्ग रोहयोत गर्क तर शेतकरी पेरणीच्या चिंतेत
Advertisement

शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने रोहयो वेळेत बदल करण्याची ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे मागणी

Advertisement

वार्ताहर /उचगाव

भातपेरणी हंगामाला शेतकरी वर्गाला कामगार मिळणे मुश्कील झाल्याने यावषी भातपेरणी करावी की नाही, या द्विधा मनस्थितीत शेतकरीवर्ग अडकला आहे. सध्याचे चित्र पाहता ‘महिलावर्ग रोजगार हमी योजनेत गर्क तर शेतकरी भात बियाणे पेरणीच्या चिंतेत’ असल्याने गावातील शेतकरी वर्गाने ग्रामपंचायतीकडे धाव घेऊन या रोजगार हमी योजनेतील महिलांच्या वेळेत थोडा बदल करावा आणि या महिला भातपेरणी हंगामाला कशा मिळतील याबाबत विचार करण्यासाठी ग्रामपंचायत अध्यक्षा, उपाध्यक्ष आणि पीडीओ, सेव्रेटरी यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र खरीप हंगाम साधण्यासाठी सर्व शेतकऱ्यांची धडपड दिसत असल्याचे चित्र पाहता शेतात काम करण्यासाठी कामगारवर्ग मिळणे कठीण झाले आहे. यामुळे शेतीचे सर्वच तंत्र बिघडल्याचे दिसून येत आहे. शेतामध्ये काम करण्यासाठी घरातील मोजकीच मंडळी उपलब्ध आहेत.  बाहेरून येणारा कामगार वर्ग मिळत नसल्याने शेतातील अनेक कामे खोळंबली आहेत. सध्या सर्वत्र रोजगार हमी योजनेत महिलावर्ग गुंतल्याने सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या महिला रोजगार हमी योजनेत काम करत आहेत. परिणामी शेतात काम करण्यासाठी आज कामगारवर्ग मिळत नाही. मग शेती करावी कशी हा यक्षप्रŽ शेतकऱ्यांसमोर आज उभा ठाकला आहे.

Advertisement

रोहयो महिलांच्या वेळेत बदल करा

यासाठी उचगाव गावातील शेतकरी वर्गाने उचगाव ग्रामपंचायतमध्ये धाव घेऊन ग्रामपंचायत अध्यक्षा, उपाध्यक्षासह पीडीओ यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेतील ज्या महिला आहेत त्यांना सकाळी सात ते बारा या वेळेत काम देऊन उरलेल्या 12 ते सायंकाळी पाच सहा वाजेपर्यंत शेतीच्या भातपेरणी हंगामाला मदत होईल. यादृष्टीने विचार करावा आणि वेळेत बदल करावा, अशा मागणीचे निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे.

...तर शेती करण्यास मदत होईल

महिलांच्या कामाच्या वेळेत बदल केल्यास भातपेरणी हंगामाला या महिला वर्गाची मदत होणार आहे. आज अनेक शेतकरी कुटुंबातील महिला या रोजगार हमी योजनेत गुंतल्याने शेतकरी पुऊष मंडळींना काय करावे, याची चिंता लागून राहिली आहे. यासाठी उचगाव ग्रामपंचायतीने तसेच या भागातील सर्वच ग्रामपंचायतींनी रोजगार हमी योजनेतील महिलांसाठी सकाळी सात ते बारा याप्रमाणे वेळापत्रक ठरवून या महिलांना 12 नंतर शेतीतील कामासाठी मुभा दिली तर शेती व्यवसाय करण्यास शेतकऱ्यांना मदत होईल. निवेदनप्रसंगी माजी तालुका पंचायत अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष संभाजी कदम, रामा कदम, ब्रह्मानंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य बंटी पावशे, संतोष पाटील, मनोहर होनगेकर, दीपक पावशे, गजानन नाईक, मनोहर कदम, अशोक कलजी यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.