For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | उंब्रजमध्ये खांद्यावर पोते घेणाऱ्या 'त्या' महिलेचा थरार! नागरिकांवर थेट चाकू आणि काठीने हल्ले; परिसरात दहशत

01:19 PM Jun 15, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   उंब्रजमध्ये खांद्यावर पोते घेणाऱ्या  त्या  महिलेचा थरार  नागरिकांवर थेट चाकू आणि काठीने हल्ले  परिसरात दहशत
Advertisement

उंब्रजः येथे गेल्या काही दिवसांपासून एका महिलेच्या सततच्या हिंसक वर्तनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे बातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाने महिला व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून एका महिलेने उंब्रज (ता. कराड) येथे हिंसक वृत्तीचा कहरच केला आहे.

Advertisement

खांद्यावर पोते घेऊन प्लास्टिक गोळा करण्यासाठी उंब्रज बाजारपेठ, बसस्थानक परिसर तसेच कॉलेज मार्गासह विविध ठिकाणी भल्या पहाटेपासून दिवसभर ही महिला फिरताना दिसते. या दरम्यान ती अचानक समोर येणाऱ्या नागरिकांवर कधी पाठीमागून, कधी समोरून काठीने मारणे, तर कधी हातात असलेल्या वस्तूने अगदी धारदार शस्त्रानेही हल्ला करण्याचे प्रकार तिच्याकडून घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये विशेषतः बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या महिला व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चार दिवसांपूर्वी उंब्रज येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली. आईसोबत घरी जात असलेल्या एका १५ वर्षीच्या मुलीच्या हातावर या महिलेने अचानक चाकूने हल्ला केला. या घटनेत मुलीच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून, तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मुलगी व तीची आई सदरच्या प्रकाराने प्रचंड घाबरली होती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संताप व भीती बाढली आहे. ही घटना उंब्रज पोलिसांना समजताच त्यांनी सदर महिलेला समज देऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केले असल्याचे समजते. कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये या अनुषंगाने पोलिसांनी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.