For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बैलहोंगल बसस्थानकावर महिलेचे साडेपाच लाखांचे दागिने लांबविले

07:50 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
बैलहोंगल बसस्थानकावर महिलेचे साडेपाच लाखांचे दागिने लांबविले
Advertisement

बस पोलीस स्थानकात नेऊन संपूर्ण प्रवाशांची तपासणी

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

देवदर्शनाला जाण्यासाठी बसमध्ये चढताना एका महिलेच्या अंगावरील साडेपाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने भामट्यांनी पळविले आहेत. बैलहोंगल बसस्थानकावर घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. बैलहोंगल पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. ननगुंडीकोप्प, ता. बैलहोंगल येथील मंगला बसय्या देसाई (वय 35) या गुरुवारी मरकुंबी येथील श्री चामुंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आपल्या कुटुंबीयांसह जात होती. बसस्थानकावर बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत भामट्यांनी मंगला यांच्या गळ्यातील 35 ग्रॅम सोन्याचे दागिने हिसकावून घेतले आहेत.

Advertisement

हा प्रकार उघडकीस येताच धक्का बसलेल्या मंगला यांना रडू कोसळले. बैलहोंगल पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. ज्या बसमध्ये ही घटना घडली होती ती बसच पोलीस स्थानकाला नेऊन प्रत्येक प्रवाशाची बॅग तपासण्यात आली. मात्र, यामुळे चोरीचा उलगडा झाला नाही. बैलहोंगल बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. बैलहोंगल, कागवाड, अथणी, बेळगावसह विविध बसस्थानकांवर चोऱ्या करणाऱ्या महिलांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. आता पुन्हा बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या बॅग व दागिने पळविण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.

Advertisement
Tags :

.