कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बाहुलीसारखी दिसण्याचा महिलेचा हट्ट लाखो रुपये केले खर्च

06:01 AM Mar 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

या जगात जवळपास प्रत्येक महिला अत्यंत सुंदर दिसून इच्छिते. प्रत्येक महिला स्वत:च्या आर्थिक स्थितीनुसार स्वत:च्या सौंदर्यावर पैसे खर्च देखील करते. कुणी मेकअपची महागडी सामग्री खरेदी करते, तर कुणी महाग कपडे खरेदी करत असते. परंतु काही लोकांमध्ये सुंदर दिसण्यासाठी हट्ट असतो, जो कुठल्याही पातळीपर्यंत जाण्यास त्यांना करत असतो. अमेरिकेतील महिलेने असेच केले आहे. या महिलेला बार्बी डॉलप्रमाणे सुंदर व्हायचे होते, तरुण दिसायचे होते, याकरता तिने अन्य इसमाची चरबी स्वत:च्या चेहऱ्यात प्रत्यारोपित करून घेतली, या शस्त्रक्रियेसाठी तिने लाखो रुपये खर्च केले आहेत.

Advertisement

Advertisement

47 वर्षीय मार्सेला इग्लेशियस काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. तिने स्वत:चा 23 वर्षीय पुत्र रोड्रिगोचे रक्त स्वत:च्या शरीरात चढवून घेतले होत. ती याप्रकारे नेहमी तरुण दिसत रहावी असा प्रयत्न करतेय. परंतु आता तिने आणखी एक अजब कृत्य केले आहे. तिने दुसऱ्या व्यक्तीची चरबी स्वत:च्या चेहऱ्यात आणि शरीरात इंजेक्ट करविली आहे.

मार्सेला स्वत:ला ह्युमन बार्बी संबोधिते. ही नवी ट्रीटमेंट कमाल आहे आणि यामुळे माणूस स्वत:चे नैसर्गिक फॅट पुन्हा प्राप्त करू शकतो. याद्वारे मी अधिक तरुण दिसू लागली आहे असा तिचा दावा आहे. मार्सेलाने स्वत:च्या कॉस्मेटिक ट्रीटमेंटर 95 लाखापेक्षा अधिक रक्कम खर्च केली आहे. ती स्वत:चे हात, पाय, चेहऱ्यावर अधिक ग्लो मिळविण्यासाठी फॅट इंजेक्ट करवून घेत आहे.

लोक करतात ट्रोल

सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. या ट्रीटमेंट्सचा माझ्या शरीरावर प्रभाव दिसून येत आहे याचा मला आनंद आहे. मी कुठल्याही प्रकारे चाकूचा वापर करत नाही, उलट रिकव्हरीची देखील कुठलीही गरज नाहे. फिरलपासूनच मला रिझल्ट दिसून येतोय. मी इतकी तरुण कशी दिसते असे लोकांनी विचारल्यावर मी आनंदी होते असे मार्सेलाने सांगितले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article