For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युवा होताच महिलेचे ‘पुरुषा’मध्ये रुपांतर

06:29 AM Jul 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
युवा होताच महिलेचे ‘पुरुषा’मध्ये रुपांतर
Advertisement

उत्तर अल्बानियाच्या ओबडधोबड पर्वतांमध्sय शतकांपेक्षा जुनी एक अनोखी परंपरा आजही काही परिवारांमध्ये कायम आहे. येथे महिला युवा होताच ‘पुरुषा’ प्रमाणे जगू लागतात. त्यांना ‘बुर्नेशा’ म्हटले जाते, हा शब्द अल्बानियन भाषेत ‘पुरुषा’चा अर्थ बाळगून आहे. या महिला परिवाराच्या प्रमुख होत सर्व जबाबदाऱ्या पुरुषांप्रमाणे पार पाडतात, परंतु याकरता त्यांना मोठी किंमत मोजावी लागते. त्यांना आयुष्यभर विवाह न करण्याची आणि अपत्यांना जन्म न देण्याची शपथ घ्यावी लागते.

Advertisement

ही परंपरा कनून नावाच्या प्राचीन आदिवासीय कायद्यावर आधारित आहे. कनून शतकांपासून उत्तर अल्बानियाच्या पर्वतीय भागांमध्ये जीवनाला नियंत्रित करत राहिले आहे. जेव्हा एखाद्या परिवारात कुठलाच पुरुष वारस शिल्लक राहत नाही तेव्हा परिवाराची कन्या बुर्नेशा होण्याचा निर्णय घेऊ शकते. शपथ घेतल्यावर त्या महिलेला पुरुषाचा दर्जा मिळू शकतो.

पुरुषांचे आयुष्य

Advertisement

ही शपथ घेतल्यावर महिला पुरुषांचे कपडे परिधान करतात, त्या स्वत:ला पुरुषांचे नाव ठेवून घेतात. समाज त्यांना पुरुषाच्या रुपात संबोधितो, त्या संपत्ती खरेदी करू शकतात, वारसा मिळवू शकतात, घराच्या प्रमुख होऊ शकतात, पुरुषांच्या क्षेत्रात हिंडू-फिरू शकतात. सामान्य महिलांना नसलेले स्वातंत्र्य अन् अधिकार या बुर्नेशांना प्राप्त हातात. परंतु शपथ अत्यंत कठोर आहे. एकदा शपथ घेतल्यावर माघार घेता येत नाही. शपथ तोडल्यास सामाजिक बहिष्कार अन् बदनामी निश्चित आहे. याचमुळे या महिला आयुष्यभर अविवाहित राहतात.

कशी सुरू झाली परंपरा?

पूर्वीच्या काळात ही परंपरा परिवाराची इज्जत अन् संपत्ती वाचविण्याची एक पद्धत होती. युद्ध, आजार किंवा दुर्घटनेत पुरुष मृत्युमुखी पडल्यावर परिवार कोलमडायचा. बुर्नेशा होत एक मुलगी पूर्ण परिवाराला सावरत होती. समाज देखील याला स्वीकारत होता. सध्या आधुनिकता आणि कायदेशीर बदलांमुळे ही परंपरा जवळपास संपुष्टात आली आहे. अल्बानियामध्ये महिलांना समान अधिकार मिळाले आहेत. शाळा, कॉलेज आणि नोकऱ्यांमध्ये महिला आघाडी घेत आहेत. यामुळे नवी पिढी बुर्नेशा होण्याचा मार्ग निवडण्याऐवजी सामान्य जीवन जगणे पसंत करते. सध्या केवळ मोजक्या बुर्नेशा असल्याचे सांगण्यात येते आणि यातील अनेकींचे वय 70-80 वर्षांच्या पार आहे. त्या अद्याप देखील पुरुषांच्या कपड्यांमध्ये राहतात आणि समाज त्यांना सन्मान देतो. त्यांच्या कहाण्या स्थानिक लोक आणि विदेशी पत्रकारांना आकर्षित करतात.

Advertisement
Tags :

.