For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांदा येथे कपडे धुत असताना लाईन तुटल्याने महिलेचा दुर्देवी मृत्यू

10:57 AM May 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
बांदा येथे कपडे धुत असताना लाईन तुटल्याने महिलेचा दुर्देवी  मृत्यू
Advertisement

रोख भरपाई न दिल्यास मृतदेह सावंतवाडी कार्यालयात नेणार ; बांदा ग्रामस्थ आक्रमक

Advertisement

मयुर चराटकर
बांदा
बांदा गडगेवाडी येथील कुंभारदेवणे ओहळात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज लाईन तुटून पडल्याने जागीच दुर्देवी मृत्यू झाला . विद्या वामन बिले ( वय 60 )असे त्या महिलेचे नाव आहे. घडलेल्या घटनेने बांदा ग्रामस्थ आक्रमक सदरच्या घटनेला वीज वितरण जबाबदार असून त्याला रोख दहा लाख रुपये भरपाई द्या अशी मागणी केली आहे. रोख भरपाई न दिल्यास मृतदेह सावंतवाडी वीज वितरणच्या कार्यालयात नेणार असा इशारा दिला आहे. वीज वितरणचे तालुका अभियंता इथे येईपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही असा सज्जड दम बांदा अभियंता कोहळे याना दिला. घटनास्थळी बांदा पोलीस दाखल झाले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.