महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नेसाय येथे महिलेचा सुऱ्याने भोसकून खून

11:42 AM Jan 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : पाद्रीभाट-नेसाय येथे एका महिलेचा रविवारी रात्री सुरा भोसकून खून करण्यात आला असून पोलिसांनी तीन तासातच आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फ्लोरेंतिना फर्नांडिस या 53 वर्षीय महिलेचा खून करण्यात आला. खुनानंतर घटनास्थळावरुन पळून गेलेल्या 34 वर्षीय संशयित आरोपी मारियो ओलीव्हेरा याला पोलिसांनी अटक केले. जमिनीच्या मालकीहक्कावरुन हे खुनाचे हे प्रकरण घडले आहे. मयत व संशयित आरोपी हे दोघेही एकमेकांचे शेजारी. त्यांच्यात वरचेवर वाद होत होते. रविवारी रात्री या दोन्ही शेजाऱ्यांमध्ये वाद सुरु होता. त्या वादातूनच आरोपीने फ्लोरेंतिना फर्नांडिस हिचा सुऱ्याने भोसकून खून केला, अशी माहिती पोलिसानी दिली. खून करणे तसेच हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या ज्युबेन ओलिव्हेरा याला सुऱ्याने जखमी केल्याच्या आरोपावरुन भारतीय दंड संहितेच्या अनुक्रमे 302 व 324 कलमाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article