For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गळ्याला सुरा लावून महिलेला लुटले

02:05 PM Aug 29, 2025 IST | Radhika Patil
गळ्याला सुरा लावून महिलेला लुटले
Advertisement

सातारा :

Advertisement

गेल्या चार दिवसांपूर्वी फलटण बसस्थानकात मंगळसुत्र चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. त्या अगोदर सातारा शहर बसस्थानकातून मंगळसुत्र चोरीला गेल्याची घटना आहे. असे असतानाच चोरट्यांनी गणेशोत्सवात कृष्णानगर परिसरातील छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोर प्रतापसिंहनगरकडे जाणाऱ्या मार्गावरुन मॉर्निग वॉक करणाऱ्या तीन महिलांपैकी एका महिलेला तिघांनी सुऱ्याचा धाक दाखवून दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झालेला असून परजिल्हा, परराज्यातील टोळी सक्रीय झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

सातारा शहरातील प्रतापसिंहनगर रस्त्याला हार्मनी पार्क येथे धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर नेहमीप्रमाणे तीन महिला पडल्या होत्या. पहाटेच्या सुमारास रस्ता मोकळा होत्या. त्या तिघी एकमेकींनाच आधार होत्या. त्याच दरम्यान, समोरुन एक दुचाकी येते. दुचाकीवर तीन जण होते. दुचाकी जवळ येवून थांबते. त्यातील पाठीमागे बसलेले दोघे उतरतात. त्यातल्या एकाकडे मोठा सुरा हातात होता. त्याने सरळ महिलेला दाखवत लगतच्या मोकळया जागेत ढकलून देत तिच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून घेतले. अचानक उद्भवलेल्या या प्रकाराने ती महिला जीवाच्या आकांताने ओरडत होती. त्या चोरट्यांना तिचा आकांत दिसला नाही. मात्र त्यांनी मंगळसुत्र मिळताच लगेच तिसऱ्या व्यक्तीने दुचाकी सुरुच ठेवली होती. त्यावर ते दोघे बसले आणि निघून गेले. हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून जीव वाचवण्यासाठी तिन्ही महिलांनी लगतच्या गेटवरुन उडीमारुन आतमध्ये जावून आधार घेतला आहे. सोनाली दीपक लोंढे असे या महिलेचे नाव असून तिच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले.

या घटनेचे वृत्त समाजमाध्यमांवरून पसरताच या घटनेची गंभीर दखल पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी घेतली. त्यांच्या निर्देशाप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला तात्काळ पाचारण केले व यासंदर्भात तातडीने तपासाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरु असून चोरटे हे परजिल्हा किंवा परराज्यातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • दागिने घालून रस्त्याने मिरवण्याचे दिवस संपले

चोरीच्या घटना वाढू लागल्याने किमान सण, उत्सव काळात तरी अंगावर दागिने घालून सुरक्षितपणे रस्त्याने मिरवण्याचे मिरवण्याचे दिवस संपले आहेत, अशी चर्चा साताऱ्यात सुरु असून ज्यांच्याकडे दागिने चोरट्यांना रोखण्याची ताकद आहे तेच हाताच्या पाची बोटात अंगठ्या, गळ्यात सोन्याची चेन, मनगटात ब्रेसलेट घालून मिरवणारेही साताऱ्यात काही तरुण पहायला मिळतात, अशीही चर्चा राजवाडा परिसरात सुरु होती.

Advertisement
Tags :

.