For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime | विट्यात लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार; नराधम तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

02:04 PM Apr 23, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime   विट्यात लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार  नराधम तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Advertisement

               लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; विट्यात युवक अटकेत

Advertisement

विटा : लग्राचे आमिष दाखवून मुलीचा सांभाळ करण्याचे वचन देत वारंवार अत्याचार केल्या प्रकरणी विटा पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. संशयित अमरजित अनिल क्षीरसागर (वय २५, रा. भवानीमाळ, पाटील वस्ती, विटा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या - माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि संशयित आरोपी अमरजित यांचे गेल्या - काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. १० मार्च २०२१ पासून २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत संशयितानेफिर्यादीच्या संभाजीनगर, पवार कॉलनी येथील राहत्या घरी वेळोवेळी भेट दिली. यावेळी त्याने फिर्यादीला तुझा आणि तुझ्या मुलीचा मी सांभाळ करेन, असे भासवले. लग्राचे आश्वासन देऊन त्याने फिर्यादीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

Advertisement

मात्र संशयित आरोपीने लग्राचे वचन पाळले नाही आणि आपली फसवणूक केली आहे, हे लक्षात येताच पीडित महिलेने विटा पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच विटा पोलिसांनी तातडीने हालचाली करत संशयित आरोपी अमरजित क्षीरसागर याला अटक केली आहे.

Advertisement
Tags :

.