For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिलेला मिळाला दुसऱ्या महिलेचा चेहरा

06:29 AM Apr 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
महिलेला मिळाला दुसऱ्या महिलेचा चेहरा
Advertisement

स्पेनमध्ये एका महिलेच्या चेहऱ्याचे प्रत्यारोपण झाले आहे. या महिलेच्या चेहऱ्याला मांस खाणाऱ्या किड्यांनी फस्त केले होते. या महिलेला एका इच्छामृत्यूची मागणी करणाऱ्या महिलेने मदत केली आहे. तिने मृत्यूपूर्वी स्वत:चा चेहरा या महिलेला दिला आहे.

Advertisement

कार्मी नावाच्या एका महिलेला एका किड्याने चावले होते, ज्यानंतर तिच्या चेहऱ्यावर धोकादायक इंफेक्शन फैलावले, यामुळे तिच्या नाकाचे मांस किटाणूंनी फस्त केले, ती स्वत:चे तोंड नीट  उघडू शकत नाही, यामुळे तिला खाणे देखील अशक्य ठरले होते. या स्थितीला फेशियल टिश्यू नेक्रोसिस म्हटले जाते. अशास्थितीत एका महिलेने कार्मीला मदत केली. ही महिला इच्छामृत्यू इच्छित होती आणि मृत्यूपूर्वी तिने स्वत:चा चेहरा दान करून कार्मीला एक नवे जीवन दिले आहे. हा प्रकार जगात पहिल्यांदाच घडला आहे.

हे चेहरा प्रत्यारोपण स्पेनच्या बार्सिलोनामधील वॉल डी हेब्रोन रुग्णालयात झाले आहे. या प्रत्यारोपणासाठी 100 तज्ञांनी मेहनत घेतली असून यात मनोविकारतज्ञ आणि इम्युनोलॉजिस्ट सामील होते. प्रक्रियेत इच्छामृत्यूची मागणी करणाऱ्या महिलेच्या चेहऱ्याच्या मध्यवर्ती भागातून कंपोझिट टिश्यू मिळवत कार्मीच्या चेहऱ्याला लावले जाणार होते. डोनरने दाखविलेल्या प्रगल्भतेने सर्वांनाच चकित केले. जिने जीवन त्यागण्याचा निर्णय घेतला होतान, तिने एका अनोळखी महिलेला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती अशी माहिती रुग्णालयाच्या प्रत्यारोपण समन्वयक एलिझाबेथ नावास यांनी दिली.

Advertisement

 

अत्यंत अवघड प्रक्रिया

शस्त्रक्रियेनंतर मी स्वत:ला आरशात पाहू शकत आहे, मला आता पूर्वीसारखेच वाटू लागले असल्याचे कार्मीने म्हटले आहे. अशाप्रकारच्या चेहरा प्रत्यारोपणाच्या प्रकरणांमध्ये दाता आणि प्राप्तकर्त्याचे लिंग आणि रक्तगट एकच असणे आवश्यक असते. याचबरोबर डोक्याचा आकारही एकसारखा असणे आवश्यक असते. हे प्रत्यारोपण कधी झाले हे सांगण्यास रुग्णालयाने खासगीत्वाचे कारण देत नकार दिला आहे.

Advertisement

.